पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असा जय संपादिला. तो असा. ब्रेस्त शहरांत फ्रेंच लोक बहुत लढाऊ गलबतें सिद्ध करीत आहेत, असे वर्त- मान ऐकून इंग्लिश अमात्यांनी सर लौड्स्ली शवेल आ- णि सर जार्ज रूक या नावांचे दोघे गृहस्थांस फ्रेंच यांचा बेत लक्ष्यांत आणावयाकरितां पाठवून दिले. बार्सि लोना ह्मणून स्पेन देशांत एक स्थळ आहे, तेथे हेसी याचे राजपुत्रानें जाऊन निरर्थक हल्ला केला होता; या ठिकाणीं भाड्याचे गलबतांतून कांहीं फौज पाठवून द्यावी. अशी दुसरीही एक आज्ञा सर जार्ज यास होती. या उद्यो- गापासून कार्य सिद्ध होण्याचा निश्चय नाहीं पाहून दोन दिवसांनी लोक परत आले. नंतर सर जार्ज रूक व सर क्रौडस्ली या दोघांनी आफ्रिका खंडाचे कांठी असतां गलवतावर लश्करी सरदारांची सभा मिळवून ठरविलें कीं, जिब्राल्टर शहरावर हल्ला करावा. तें शहर त्या वेळेस स्पानियार्ड याचे हातीं होतें. असा अकस्मात् हला येईल, हें न कळून तेथें शिपाई लोकांची चांगली तरतूद नव्हती. ते जिब्राल्टर शहर तीन वाजूंकडून मोठ्या खडपांनी वेष्टित अशा जमिनीच्या उंच प्रदेशावर आहे. त्या शहरा- जवळ हेसी याचा राजपुत्र सुमारें अठराशे लोक घेऊन आला; आणि त्यानें तें शहर आपले स्वाधीन करावें, असा निरोप पाठविला; परंतु तो ऐकिला नाहीं, असे पाहून त्याने शहरास तोफा लावण्याविषयीं दुसरे दिवशीं हुकूम केला. मग सौथ मोल्हेड या नांवाचे ठिकाणी शत्रूची ठाणीं होती, तीं सोडून ते पळू लागल्यावर, आड्मराल यानें क्यापटन विटेकर ह्मणून सरदार होता, त्यास सांगितलें कीं, सर्व होड्या तयार करून त्या ठिकाणी हल्ला करावा.