पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असें तशाच प्रतिज्ञा करून इंग्लिश दरबारचे बेतास पुष्टिक- रण केलें. असे सर्व आपले नाशाविषयों एकत्र झाले असे पाहून फ्रेंच राजास राग आला; आणि तो आपला राग मुख्यत्वे डच लोकांवर काढून अभिमानानें बोलिला की, या हलके व्यापारी डच लोकांनी माझा पराक्रमअनुभविला असतां, हे मजशीं युद्ध करावयाची प्रतिज्ञा करितात, तर ते कधीं तरी या दांडगाईचा पश्चात्ताप पावतील. भय घातल्याचे त्या राजांनी कांहीं मनांत आणिलें नाहीं. इंग्लिश सैन्याचा सरदार डयुक मार्लवरो यास नेमिलें; आणि जरी अर्ल आथ्लोन याचा त्या अधिकाराचे विभा गाविषयीं दावा होता, तरी डच लोकांनीही मार्लबरो या सच फौजेचा मुख्य जनरल नेमिलें. ही गोष्ट वास्तवीक कीं, राजसभेत वादविवाद करण्यांत, किंवा युद्धांत त्यापेक्षां अधिक असे त्या समयीं थोडे होते. तो संकट समयीं धै- यवान असे, आणि त्यास राज्यकामांत बहुत आस्था होती. ह्मणून क्रेसी आणि आजिन्कोर्ट यांचे वेळेपासून जितके इंग्लिश सरदार झाले, त्या सर्वांत हा फ्रान्स देशास परम भयंकर झाला. या राजाचे वखरेंत बहुतकरून महाद्वीपांतील युद्धांदि- कांच्या गोष्टी फ़ार आहेत. त्या युद्धापासून प्रजांचा स्वा. र्थ तर विशेष झाला नाहीं खरा; परंतु कीर्ति फार वाढली ही गोष्ट खरी कीं, त्या युद्धांतील आतां कांहीं राहिले ना- हीं; ज्यां शहरांत त्या मोठे सैन्यानें जय मिळविला, त्यांची नामें ब्लेनहिम्, रामिलीस, औदनार्द, आणि मालश- केट, हीं मात्र राहिली आहेत; परंतु स्पेन देशांत थोडा पैका खर्चून आणि थोडे लोक मरून मोठ्या उपयोगाचा