पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ प्रथम शरीरास यापासून कांही झाले नसते; परंतु त्याच्या प्रकृ तास त्यापासून मृत्यूची चिन्हें होऊं लागली. कांही दिवसपर्यंत तो बरा होईल अशी चांगली आशा वा- टत होती; पुढे त्यास कंप सुटला, आणि त्यापासून ताप आपला अंतकाळ जवळ आला, असें सम- उत्पन्न झाला. जलें तरी त्याच्या हृदयांत पूर्वीच्या चिंता होत्याच, आणि युरोप देशाचें पुढें कसें होईल, या चिंतेखाली त्याची आ पले शरीराविषयींची चिंता गेली होती. पुढे हालंड देशांतून अल आल्विमाल त्याजवळ आला तेव्हां तो पर- देशचे स्थितीविषयीं एकांत मसलत करून दोन दिवसांनीं मृत्यु पावला. त्या वेळेस त्याचे वयास बावभावें वर्षे होतें. त्यानें तेरा वर्षे राज्य केलें. प्रकरण ३३. आन राणीची कथा. संन् १७०२ पासून १७१४ पर्यंत. डेन्मार्क देशाचा राजपुत्र जार्ज याशीं जिचे लग्न झालें होतें, अशी राजकन्या आन नामें होती, ती अडति- सावे वर्षी राज्य करूं लागली; तेणेंकरून सर्व पक्षांचे लो- कांस संतोष झाला. ती राणी, हैड ह्मणून चान्सेलर जो पुढे अल क्लारेंडन या पदास चढला होता, त्याचे मुलीस जेम्स राजापासून झालेली दुसरी मुलगी तिनें राजा- सनारूड होतांच फ्रान्स देशाशी लढाई करण्याची आपली प्रतिज्ञा कामन्स यांस कळविली, त्यांनी तीविषयीं मान्यता दिली. त्याच दिवशीं डच आणि जर्मन लोकांनी