पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०३ मग फ्रान्स देशाशी युद्ध करण्याकरितां लोकांपासून प्रात- वर्षी उत्पन्न होणारे कर पुरेनात, ह्मणून ते गहाण घेऊन त्यांनी सरकारास पैका दिला; ज्यास आतां सरकारी कर्ज ह्मणतात. हे सर्व करून इंग्लंड देशात नुसते कीतींवां चून दुसरें कांहीं मिळाले नाही, आणि त्याचे पक्षाचे डच लोक यांस नेहेमी शत्रुत्व करावयास अवकाश मात्र झाला. या राजाच्या राज्यांत बहुतकरून फ्रान्स दे- शाशी युद्ध चालले होतें. शेवटी रिस्विक शह- रांत तह होऊन तो तंटा मिटला. त्यांत पडते वेळेस राजानें कांहीं विचार केला नाही. असे वाटतें की, तह करते वेळेस इंग्लंड देशचें हित कोणी पाहिले नाहीं; आणि इतका खर्च झाला, व इतके लोक मेले, या- पासून इतकें मात्र झाले की, फ्रान्स देशचे राजानें विलि यम याचा राजपणा मान्य केला. ● स्वाभाविक राजाची प्रकृति फार अशक्त असे, तशांत नेहेमी चित्ता, युद्ध, यांहींकरून फारच क्षीण झाली होती. तो आरोग्य व्हावयाकरितां घोड्यावर बसे, आणि दुसरे कित्येक प्रकारचे श्रम करी. फेब्रुअरी महिन्याचे एक- विसावे तारिखेस केसिंग्तन शहरांतून हांण्डेन ह्मणून वा- डा आहे, तेथें घोड्यावर बसून जात असतां घोडा पड- ल्यामुळे तो खाली पडला. ते वेळी गळ्याचें हाड मोडलें. सेवकांनी त्यास हांण्डेन कोर्ट वाड्यांत नेलें; तेथे ते हाड ठिकाणीं वसवून संध्याकाळी आपले रथांत बसून केसिंग- गांवांस तो गेला. वाटेनें रथांतील चालीमुळे ते हाड एकीकडे सरले, आणि राजाचा वैद्य विल्ड होता त्यानें ते पुनः ठिकाणचे ठिकाणी बसविलें. एकादे निरोगी म.ज. ब. वा. पोतदार) १० इ०स० १६९७