पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ सोळावे दिवशीं मेला. त्याचे कबरीजवळ बहुत चमत्कार झाले, असें त्या वेळचे लोक लगत असत. वास्तवीकच त्याचे आयुष्याचे शेवटीं तो फार धर्मानें वागत असे. त्यानें शरी- रास दुःख बहुत दिलें, आणि तो लात्राप या नांवाचे ठि- काणचे गरीब महंताचे दर्शनास नेहमी जाई; ह्मणून ते त्याचा नम्र आणि धार्मिक आकाराने संतोष पावत असत. त्याचा अभिमान आणि स्वच्छंद प्रकृति ही त्याचे संपत्ती बरो- बर निघून जाऊन शेवटी तो दयाळू, भला, आणि आपले सर्व लोकांजवळ सुशील झाला होता. त्याने शेवटचे दुख- ण्यांत आपले मुलाला उपदेश केला कीं, सर्व ऐहिक सुखा- पेक्षां धर्म अधिक असा तूं निश्चय धर. त्या राजपुत्राने तसे केलें. असा तो मोठ्या भक्तिलक्ष करून मेला; त्याच्या सांगण्याप्रमाणे पारिस शहरांत इंग्लिश बिनिदिक्त महंत लोकांचे देवळांत कांही विशेष शोभा न करितां त्यास पुरलें. राजाच्या स्वीकार करते वेळेस विलियम यानें निश्चय केला होता की, आपल्याजवळ जितकी सत्ता बाकी राहिली आहे तितकी संरक्षण करावी; परंतु पुढे पार्लमेंट सभेत दिवसानुदिवस त्याचे सत्तेविषयीं नवे नवे नियम होऊं ला- गले, ह्मणून त्याने कंटाळून त्याविषयींचा तंटा सोडिला. फ्रान्स देशचे सरकाराशी लढाई चालवावयास जो पैका लागेल तो आपणास द्यावा, असा करार करून घेऊन, त्यास आपले मर्जीप्रमागें चालावयास मोकळीक दिली. युद्ध आणि युरोप देशांतील सरकारचे सामर्थ्य सारिखें असावें इतकेंच त्याचे मनांत असे. या कामाकरितां पार्ल- भेंट सभेनें त्यास पैका दिला ह्मगजे, त्यांनी कसा जरी राज्य कारभार चालविला तरी तो मनाम आगीत नसे.