पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०१ अशा समयीं त्यांनीं निश्चय केला कीं, या ठिकाणीं राहून जें घडेल तें घडो. तें ऐरिश यांचे शेवटचें आश्रयस्थान बहुत वेळपर्यंत लढलें; परंतु पुलापासून दहा पावलांवर शत्रु आले. मग आपण चारही बाजूंनी कोंडले गेलों, असें पा- हून ऐरिश लोकांनी शत्रूंचे स्वाधीन व्हावयाचा निश्चय केला. लागलाच उभयपक्षींचा युद्धोद्योग बंद होऊन सला होण्याचा उपक्रम निघाला. त्या तहांत असें ठरलें की, द्वितीय चार्लस राजाचे अमलांत जसे रोमन क्याथो- लिक लोक स्वतंत्रतेनें धर्माचरण करीत होते, तसे पुढे चालावें. सर्व लोकांस मोकळीक झाली कीं, कोणाची मर्जी असल्यास मुलें माणसे घेऊन इंग्लंड आणि स्काट्- लंड या दोहों शिवाय पाहिजे त्या देशीं जाऊन राहावें. अशी मोकळीक मिळाल्यावर जेम्स याचे पक्षाचे ज्यांनीं पूर्वी युद्ध केलें होतें, ते फ्रान्स देशास जाऊ लागले, त्यांस सरकारानें भाड्याची गलबतें करून त्या देशी पोंचविलें. त्या समयीं जेम्स राजा केवळ निराश झाला. इंग्लंड देश घेण्याचा त्याचा वेत सर्व फसला, आणि राजा विलियम यास चोरून मारावा, इत- की युक्ति मात्र त्याचे मित्रास आशा करावयास बाकी राहिली. सांगतात कीं, अशे उद्योगांस जेम्स राजा मदत करीत असे, परंतु शेवटीं या यत्नापासून त्यांचे करणारांचा नाश मात्र झाला. त्यानंतर पुढे सात वर्षांनी जेम्स मृत्यु पावला; तंवपर्यंत सेंटजर्मेन ठिकाणी लुइस याचे औदार्यावर आ णि त्याची मुलगी व दुसरे इंग्लंड देशांतील स्नेही यांचे धर्मावर उपजीविका करून होता. तो फार दिवस दुख- तोल सप्तंबर महिन्याचे ण्यानें पीडित होऊन संन् १७०० इ०स० १६९२