पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुसरे दिवशीं मोठे सकाळीं सूर्योदयाबरोबर राजा वि लियम यानें नदींतून मार्ग काढण्यास हुकूम दिला. फौज तीन ठिकांणीं पलीकडे गेली. मग निकरानें तोफांचा मार होऊन युद्ध मोठ्या आवेशानें चालू झालें. ऐरिश सैन्य कांहीं वेळपर्यंत पराक्रम करून आपले मदतीस फ्रेंच आणि स्विस पलटणी आल्या होत्या, त्यांस लवकरच सो- डून पळाले. विलियम आपले स्वार बरोबर घेऊन गेला, आणि आपला उद्योग व चपलता यांहींकरून विजय संपा- जेम्स लढाईंत न येतां उन्मोर पर्वतावर जाऊन कांहीं घोडेस्वारांनिशीं एकीकडे बसला होता; आणि आपलें सैन्य शत्रूचा पराभव करितें पाहून मध्ये मध्ये ह्मणत असे कीं, "माझे इंग्लिश लोकांवर दया करा." ऐरिश सुमारे पंधराशें मेले. आणि प्रातेस्तंत याचे एक तृतीयांशाइतके पडले. तो विजय मोठा प्रसिद्ध आ णि निश्चित झाला, परंतु विलियम याचे पक्षाचा ड्युक शांवर्ग पाण्यांतून जात असतां गोळी लागून मेला, हा नाश शत्रूंचे नाशापेक्षां अधिक झाला. दिता झाला. जेम्स याचे पक्षाची अशी शेवटची लढाई आश्रिम शहरांत झाली. त्या प्रसंगीं शत्रूनीं मोठ्या निकरानें लढाई करून घोडेसारांस कित्येक वेळा मागें हटविले; परंतु इंग्लिश लोक कमरेइतके चि खलांतून मोठ्या संकटानें पलीकडे सुके भूमीवर जाऊन पुनः घोर युद्ध करूं लागले. नंतर सेंटरूथ ह्मणून ऐरिश लोकांचा सेनापति होता, तो गोळी लागून मेला; त्यामुळे त्याचें सैन्य चहूकडून व्याकूळ होऊन लिमरिक ठिकाणी हटलें. त्या वेळेस त्यांचे लोक पांच हजारांवर पडले होते; इ०स० १३९१