पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९९ आहेत असे त्यास दिसले. तिकोनेल ह्मणून त्या देशचा अध्यक्ष, यास त्याचा अभिमान होता; त्याची जुनी फौज त्याच्या पक्षास होती; आणि दुसरी नवीही ठेविली. ती सारी मिळून चाळीस हजार जमली. ली. हवा नीट झाल्यावर त्यानें लंडन्डरी ह्मणून एक गांव आहे त्यास वेढा घातला. तो गांव लाहान आहे, परंतु या प्रसंगी त्यानें टिकाव धरिला ह्मणून त्याची प्रसिद्धि झा मग तेथील लोकांनी श्रम आणि दुष्काळ यांपासून बहुत क्लेश भोगिले; शेवटीं गलबत येण्याची बंदी केली होती, ती मोडून एक जिन्नस भरलेले गलबत येऊन ते सुखी झाले. तेणेंकरून नगरचे लोकांस हर्ष झाला, परंतु राजपक्ष्यांस क्रोध आला; आणि ते निराश होऊन वेढा टाकून रात्रीं निघून गेले. त्या ठिकाणी त्यांचे लोक नऊ हजारांवर पडले. बाय्न् नदीचे दोहों परस्पर दृष्टादृष्ट झाली. कांठ्यांवर त्या दोन सैन्यांची त्या ठिकाणीं ती नदी फार खोल नव्हती, आणि तींतून त्या फौजा पा- यींही उतरून गेल्या असत्या, परंतु कांठावर जुनीं घरें मोडून पडली होती आणि खाडे होते ह्मणून शत्रूंचा बचाव झाला. नंतर प्रातेस्तंत मताचे फौजेचा सरदार विलियम युद्धाचा बेत पाहावयाकरितां उभयपक्षी- चीं सैन्यें पाहावयाकरितां घोड्यावर बसून इकडे तिकडे नदीचे कांठावर फिरत होता; तें शत्रूच्या लश्करांत कोणी पाहून हळूच एक तोफ त्यावर मारिली. त्या गोळ्यानें वि लियम याचे कित्येक सेवक पडले; आणि याचे खांद्यास जखम झाली. इ०स० १६९०