पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९८ आरेंज याचा राजपुत्र आणि राजकन्या या दोघांनीं मि- ळून राज्य करावें; त्यांत काम कारभार राजपुत्राच्या हातानें व्हावा असा निश्चय झाला. प्रकरण ३२. तृतीय विलियम राजाची कथा. संन् १६८९ पासून १७०२ पर्यंत. या समयीं लोक असे झाले होते की, त्यांस राजाने आज्ञा केली असतां ती त्यांनी न मानितां विचार करीत बसावें. ह्मणून राजा विलियम सिंहासनारूढ होताच तो त्यांवर अंमल कसा चालवावा या संकटांत पडला. पूर्वीचे राज्यांत बखेडा होण्यास, आणि राजा पदच्युत हो- ण्यास जे कारण झालें, तेंच याही राज्याचे प्रारंभी घडून आलें. विलियम, काल्विन याच्या मताचा होता, ह्मणून धर्माविषयी कोणास उपद्रव द्यावा, हे त्यास वाईट वाटत असे. हा सर्वांचा धर्म एक असावा, असे जे नियम होते ते मोड- ण्याचा त्यानें उद्योग केला; तो जरी सिद्धीस गेला नाहीं, तरी हुकूम झाला कीं, जो सेवेची शपथ घेईल, आणि गुह्य सभेत न जाईल, त्याने आपले मताप्रमाणे चालावें. इतकें झालें तरी जेम्स यास अधिकार आहे, असे अय- लंड बेटांत बोलणें होतेंच.. त्यावर भरंवसा ठेवून तो राजा तेथे जाण्याकरितां ब्रेस्त बंदरांत गलबतावर बसून मे महि- न्याचे बेविसावे तारिखेस किन्सेल शहरास पोंचला. पुढे लवकरच त्याची वारी उघड डब्लिन शहरास गेली, आ णि तेथे पाहातो तंव सर्व गोष्टी यथास्थित अनुकूळ