पान:आलेख.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





 श्रीमद्भागवत हा ग्रंथ एकंदर पुराण ग्रंथात फार महत्त्वाचा आहे. प्राकृत

संसारी जीवास, संसारातील दुःखमय समुद्रातून पार नेणारी ती एक नौकाच आहे.

बारावा स्कंध म्हणजे भागवतांचा उपसंहार होय. 'तदेव सत्यं तदुहेव मंगलं तदेव

पुण्यं भगवद्गुणोदयम् । ज्यात भगवंताच्या गुणांचा उत्कर्ष वर्णिला जातो तेच

वर्णन खरे, तेच पवित्र,आणि तेच पुण्यकारक होय.अशा भागवत ग्रंथातील ही

मार्कंडेय कथा अशीच पुण्यप्रद आहे.


            X X X





















आलेख             ९२