पान:आलेख.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





तीन - नोंदी



एक: मराठी साहित्यातील भीष्म


 'भीष्म' या महाभारतातील व्यक्तीला प्राधान्य देऊन मराठी साहित्यिकांनी

अद्याय विशेषलक्षणीय व्यक्तिचित्रण केल्याचे आढळत नाही. यांचा अर्थ मराठी

प्रतिभेला भीष्माच्या व्यक्तिमत्वाचे काव्यानुकूलत्व जाणवले नाही असा नाही.

आपल्या महाभारतीय कथेवर आधारित लेखनाच्या ओघात त्यांनी भीष्माचे चित्रण

केले आहे.

 भोष्माची कर्तव्यकठोर प्रतिज्ञा आणि महान त्याग त्यांच्या मनात खोलवर

रूजला आणि त्यासाठीच प्रामुख्याने भीष्म अर्वाचीन मराठी ललित साहित्यात

अवतीर्ण झाला आहे. 'राजर्षी भीष्म' आणि 'सीमावृक्ष' ही दोन पुस्तके नावानिशी

भीष्माच्या जीवनाचा सर्वांगीण आलेख काढणारी आहेत; त्यांचे स्वरूप चरित्रात्मक

असून वैचारिकतेला व विवेचनाला त्यांत प्राधान्य दिले आहे. 'डॉ.रा.शं.वाळिंबे'

किंवा सत्यदेव परिव्राजक' यांच्या विस्तृत लेखनाप्रमाणे 'दुर्गाभागवत 'इरावती

कर्वे,' 'बाळशास्त्री हरदास' शं. के. पेंडसे इत्यादी लेखकांनी आपले लेखन केले.

असले तरी त्यांच्या स्फुट स्वरूपाच्या लेखांनी निर्विवादपणे भीष्माविषयी फार

मौलिक चिंतन केले आहे.

 'दुर्गाभागवत' अश्रू हरवल्यावर एखाद्या माणसाची काय स्थिती होते है

ऐन तरुणपणी अधू हरवलेल्या भीष्माच्या चित्रणातून साकार करतात. तर इरावती

कर्वे आपल्या शेवटच्या प्रयत्ना' मध्ये भीष्माच्या जीवनातील सारी निष्फळ प्रय-


आलेख             ९३