पान:आलेख.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





 मार्कंडेय त्या उचंबळणा-या समुद्रासारख्या पाण्यात हेलकावे खाऊ लागला.

जलचर प्राणी त्याला गिळंकृत करण्यासाठी धावू लागले. अशा महाभयंकर स्थितीत

तो सापडला असतांना थोड्याच अंतरावर त्याला एक डोंगर दिसला. त्या डोगरा-

वर पाने आणि फळे यांनी डवरलेला, लदलेला एक वटवृक्ष आढळला. त्या वटवृक्षा-

वरील ईशान्येकडील फांदीवर एका पानाच्या द्रोणात एक अत्यंत रमणीय देखणं

मूल निजलेलं त्याच्या दृष्टीस पडले. एका सुंदर बालकाच्या रुपात भगवंतानं

विश्वरूप दर्शन घडविले आणि परमेश्वराच्या अगाध मायेची मार्कंडेयाला जाणीव

झाली. सहा मन्वंतरं चाललेल्या मार्कंडेयाच्या अत्यंत घोर तपश्चर्येची ही फल.

प्राप्ती होती. तपश्चर्या चालू असतांना पुरंदर नामक इंद्रानं त्याला संमोहित करण्या-

साठी पुष्कळ प्रयत्न केले. प्रथम वसंत ऋतू निर्माण केला होता. त्यानंतर अप्सरा

गंधर्वासह मदनही पाठविला. पण व्रती मार्कंडेयावर यापैकी कोणत्याही गोष्टींचा

परिणाम झाला नाही. अखेर या नरनारायणाचे, मायेचे, नव्हे साक्षात् बालमुकुंदाचे

आणि शंकराचेही दर्शन झाले. भगवान नारायणाच्या योगमायेच्या प्रभावाची अनु-

भूती आल्यानं अखेरी मार्कंडेय त्याला शरण गेला. तेव्हा महादेवानं प्रसन्न मनानं

त्याला वरदान दिलं.

 'तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील, यश अविच्छिन्न राहील, त्रिकाल ज्ञान प्राप्त

होईल. आत्मानात्म विचार उत्तम समजेल, तू श्रेष्ठ पुराणिक होऊन, कल्प समाप्ती

पर्यंत, अजरामर होशील." म्हणूनच मार्कंडेय चिरंजीव गणला आहे.

 मार्कंडेयाला हे वरदान शंकराला पार्वतीने केलेल्या विनवणीवरून मिळतं.

शंकर पार्वती विमानातून विहार करीत असतांना, पार्वतीच शंकराला प्रत्यक्ष

सिद्धी देणाऱ्या आपल्या पतिदेवाला, मार्कंडेयाला. त्याच्या तपश्चर्येचे फल द्यायला

सांगते. पण शंकर म्हणतो, 'मोक्ष किंवा अन्य कोणत्याही उपभोगांची इच्छा नस

लेल्या या ब्रह्मर्षीला आपण नुसतं भेटू या.' असं ठरवूनच शंकर पार्वतीसह मार्क-

डेयाला भेटतो. आणि भेटताक्षणी समाधिस्त मार्कंडेयाच्या हृदयाकाशात शिरतो. त्या

जाणिवेनं मार्कंडेयाची समाधी उतरली आणि तैलोक्याधिपतीला त्याने नमस्कार

केला. प्रसन्न झालेल्या शंकराने जेव्हा त्याला वर मागण्याचा आग्रह धरला, तेव्हा

मार्कंडेय उत्तरला. 'भगवान श्रीहरीच्या ठायी, भगवद्भक्ताच्या ठायी आणि

तुमच्या ठायी माझं अढळ प्रेम असावं, मार्कंडयानं आपलं निरपेक्ष मागणं मागितलं,

तरी शिवानं त्याला चिरंजीवित्त्व बहाल केलं, आणि तो म्हणाला, "हे महर्षे !

तुझी सर्व इच्छा पूर्ण होईल. श्रीहरीच्या ठिकाणी तुझी अखंड भक्ती राहील, इत-

कच नव्हे तर, तुझी पवित्र कीर्ती सर्वत्र पसरून तुला कल्पसमाप्ती पर्यंत वृद्धपण

आणि मृत्यू येणार नाहीत; त्याचप्रमाणे भूत भविष्य आणि वर्तमान अशा तिन्ही


आलेख            ९०