पान:आलेख.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





 वि. आ. खैरे यांनी एकलव्याच्या निमित्ताने सामाजिक विषमतेच्या प्रश्नाला

स्पर्श केला आहे.

 "लिंबाच्या फोडी जशा सालाच्या आत एकतच पण वेगवेगळघा उपजतात

तसे आम्ही निपजतो, वाढतो, पिकतो, गळतो, सुकतो व मातीत मिळून जातो.

वेगवेगळेच, त्या चौकटीच्या कुप्या भरीत | अढळ मानतात त्या धूवाला सुद्धा गती

आहे म्हणे ! आमच्या या व्यवस्थेचा संदर्भ मात्र धृवापेक्षाही अढळ आहे." (पु.२० )

 "परम धर्माच्या मापानं पाहिलं तर प्रत्येक प्राणिमाताला विद्येचा अधिकार

आहे. माणुसकीच्या मापानं प्रत्येक माणसाला आहे, मग तूच त्याला कसा अपवाद

होशील ? " ( पृ. २० )

 एकलव्याविषयीच्या आत्मीयतेने द्रोणाचार्य हळहळतात. एकलव्य जर

आपण कौरावश्रित होण्याआधी भेटला असला तर त्याला शिकविण्यात त्यांना

भूषणच वाटले असते. "मातीच्या गोळ्यांना आकार देत बसण्यापेक्षा हिन्याचे पैलू

पाडण्यात अधिक आनंद आहे. पण त्याचाही समाजव्यवस्थेपुढे नाईलाज होतो. ते

म्हणतात, "माणूस म्हणून तुला विद्येचा पूर्ण अधिकार आहे. पण ते या व्यवस्थेत

कुणाला पटणार नाही. या शताधिक द्विजांच्या मेळाव्यात तू एकलव्य नव्हे एकला

होऊन पडशील." (पृ. २१)

 खैरे यांनी एकलव्याच्या व्यक्तित्वाला आपल्या प्रतिभाचक्षूंनी न्याहाळले.

आहे. द्रोण आणि एकलव्याचे अत्यंत प्रत्ययकारी चित्र ते रेखाटतात. मनोमनी

द्रोणाचार्यंही हेलावतात. समाज आणि व्यवहाराच्या मर्यादा त्यांच्यावर पडल्या,

असहाय्य होऊन ते एकलव्याला नकार देतात. 'मी माणूस' ही एकलव्याची जाणीव

येथे प्रभाविपणे व्यक्त होते. एकलव्याच्या जीवनाकडे या भूमिकेतून प्रथमतःच

नाटककार खैरे यांनी पाहिले आहे. एकलव्याविषयी एका संवेदनशील प्रतिभावं-

ताच्या मनाने व्यक्त केलेला हा आविष्कार आहे. एकलव्याला धनुर्विद्येचा ध्यास

आहे. धनुर्विद्या आत्मसात करण्याचा संदेश या नाटकात धनुर्विद्येच्याच परिभाषेत

दिला आहे.

 या विद्येला शरिराचा कमठा करावा लागतो. अन् बुद्धीच्या दोरीनं कसावा

लागतो. निष्ठेच्या अंगठयाने ती दोरी खेचावी लागते ! एकलव्याचा प्रयत्न

त्याच्या अशा खडतर साधनेतून दिसतो, तो म्हणतो - "मी आनंदयात्री | माझी

माय धरित्री... वृक्षवल्ली सोयरी | प्रेम करतो चराचरी." (पृ. ४३) या

निष्ठेने केवळ गुरूप्रेरणेनेच तो सिद्धी मिळवितो. "मी एकुलता एक माणूस, माणूस


आलेख             ८४