पान:आलेख.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





आहेत. प्रारंभी अश्वत्थाम्याला ते घडविण्याचा प्रयत्न करतात. पण तो निष्फळ

ठरतो. हा अपेक्षाभंग पदरी आल्यावर कौरवाकडूनही त्यांना ती आशा नाही.

एकलव्याविषयी त्यांना विधिनिषेध नाही. पण खैरे यांनी चित्रित केलेला एकलव्य

वेगळा आहे. तो एका विचारचक्रात सापडला आहे. आपण क्षत्रिय नाही, निषाद

आहोत आणि निषादाने जर क्षत्रियत्व 'राजपुत्र' म्हणून स्वीकारले तर निषाद

जातीत केवढचा दुफळ्या माजतील, याची कल्पना त्याला 'वंचरा'ने दिली आहे.

एकलव्यालाही ती कल्पना मनापासून पटते.


द्रोणाचार्यांना एकलव्यासारखा सत्शिष्य गमावल्याचे तीव्र दुःख आहे. कारण

धनुर्विद्येत त्याला विलक्षण गती होती. आणि तो पाखरांचे डावे उजवे पंख सहज..

गत्या शरसंधानाचे विषय करू शकत होता. 'शहाण्या माणसानं भावना, विवेक,

बुद्धी या साऱ्यांचा मेळ साधावयाचा असतो. हा उपदेश दुर्योधनाला करणारे

द्रोणाचार्य द्रुपदाने केलेल्या अपमानाने स्वतः मात्र भयंकर चिडले आहेत. कौरवांचे

आश्रित होऊनही ते विशेष समाधानी नाहीत. ते द्रुपदाच्या सूडासाठी पेटलेले

आहेत. म्हणूनच ..


"दान, विद्यादान सत्पात्रीच करावं हा मानदंड झाला. पण भोजनाचं पात

रिकामं असलं की पोटापाण्याचा भार उचलणारं मेषपात सुद्धा सत्पात्रच होतं. मग

पात्रतेचा प्रश्न येत नाही. मग तुमच्यासारख्या शंभर, शंभरांना विद्या द्यायचं

आव्हानपूर्वक पत्करलं जातं." (पृ. १३) असे उद्गार या नाटकांतील द्रोणाचार्य

काढतंता.


द्रोणाचार्यांच्या मनांतील व्यथा येथे मध्यमवर्गीय बुद्धिजीवी माणसांची वेदना.

म्हणून साकार झाली आहे. सरस्वतीच्या उपासनेकडून लक्ष्मीच्या उपासनेकडे वळू

पाचहणारे द्रोणाचार्य आहेत. म्हणूनच ते कौरवांच्या आश्रयाला आले आहेत. मानी

माणसाचा मनोभंग झालेला त्यांना मुळीच खपत नाही, हे मानवी स्वभावाचे

विश्लेषण खैरे यांनी अचूकपणे केले आहे. कौरवांचे गुरु होते ही द्रोणांनी केलेली

एक तडजोड होती.. "एखाद्या मेंढपाळाला लांडग्याच्या कळपाची राखणदारी

द्यावी तशी झालीय माझी दशा!"( पू. १९) हे ते स्वतः येथे बोलून दाखवितात


'वंचरा'ची संगत विद्या संपादनासाठी सोडावी लागते याचे दुःख एकलव्याला

होते, कारण काळोखात सावलीसुद्धा माणसाला सोडते:पण या वंदराने मला कधी

सोडलेला नाही. एवढा तो एकलव्याशी एकजीव झालेला आहे.म्हणूनच तो द्रोणांना

म्हणतो, “आचार्य मला तुमची विद्या हृवीय. पण तिच्यासाठी माणुसकी सोडायला

नका हो लावू." ( पू. २० )

आलेख         ८३