पान:आलेख.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





म्हणून राहीन. ना क्षत्रिय, ना शूद्र, ना निषाद, ना शसक सुद्धा फक्त

माणूस आणि मग मिळवीन तो विद्या." (पृ. २७) माणूस म्हणून जगण्याची एका

माणसाची अत्यंत महत्वाची अपेक्षा येथे लेखकाने एकलव्यमुखाने प्रगट केली आहे.

"मानवीच गुरू कशाला पाहिजे ? मानीव गुरूसुद्धा पुरतो." हे या निमित्ताने स्पष्ट

झाले आहे. गुरू शिष्य संबंधावरील लेखकाचे भाष्य ही लक्षणीय आहे. "गुरूकृपा

पाण्यासारखी असते... घेणारा आपली उंची जितकी कमी करील तितकी ती

अधिक वेगानं त्याच्याकडे धावते." (पु. ५०)

 एका अर्थपूर्ण सूचक प्रसंगाची योजना नाटककाराने येथे केली आहे. 'वंचर,

जेव्हा एकलव्याला बन्याच वर्षानंतर भेटायला येतो, तेव्हा त्याला द्रोणातून एक-

लव्य पाणी देतो. नेमका त्यावेळी वंचर एकलव्याची द्रोणावरून थट्टा करतो.

त्यावेळी त्या द्रोणाचा काटा त्याच्या अंगठयाम घुसतो तेव्हा तो वंचर म्हणतो,

"अरारारा अंगठा उडवला बघ त्यानं मोठा तिरकस रे तुझा गुरू ! " (पृ. ५३ )

या सहज बोलण्यातून नव्हे एका सूचक (Significant) प्रसंगातून एकलव्याचा

अंगठा गुरू द्रोणाचार्य मागणार याची ही पूर्वसूचना मोठ्या कलात्मकतेने व्यक्त

केली आहे. या नाटकात द्रोणाचार्य अर्जूनाला अजेय ठरविण्यासाठी गुरू दक्षिणा

म्हणून एकलव्याला अंगठा मागून घेतात पण नंतर त्यांना खूप पश्चात्ताप होतो.

एकलव्याची सुद्धा ते क्षमा मागू लागतात. त्याच्या मजोड जिज्ञासेला आणि दुर्दम्य

प्रयत्नालाच ते विद्यासंपादनाचे सारे श्रेय देतात. त्याला मनःपूर्वक आशीर्वादही

देतात.

 'द्रोण, अर्जून विसरले जातील, पण या विशाल आणि अद्भुत विश्वात जोवर

जिज्ञासा म्हणून आहे तोवर एकलव्याचे नाव सगळ्यांना स्फुर्ती देत राहील.'

  "इथे विश्वी चराचरी । आणि जिज्ञासाही जववरी

  स्फूर्ती दिजो तववरी । एकलव्य" (पृ.६४ )

 वि. आ. बेरे यांनी निश्चितपणे आपल्या स्वतंत्र प्रतिभेने एकलव्यांच्या

व्यक्तिमत्त्वाला या 'एकलव्य' नाटकात फुलविले आहे. कातळातील पिंपळासारखा

वाढायला तयार असलेला हा एकला एकलव्य आहे.


दोन प्रज्ञावान विदुर


 महाभारतातील एक महत्त्वाची व्यक्तिरेखा विदुराची असूनही त्याकडे

अभ्यासकांचे, ललित लेखकांचे वा रसिकांचे विशेष लक्ष केंद्रित झालेले आढळत


आलेख            १२