पान:आलेख.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





बारा  तीन ध्वनिक्षेपित व्यक्ती

एक: एकला- एकलव्य

  पराकाष्ठेच्या गुरूभक्तीचे उदाहरण म्हणून एकलव्याची महाभारतातील

कथा आज सर्वश्रुत आहे. पण ही कथा वाचीत असतांना तिच्यात पवित्र भीषण

नाटय भरलेले आहे असे नाटककार वि. आ. खैरे यांना जाणवले आहे. महाभार•

ताच्या कथेत सापडलेली बीजे 'एकलव्य' या नाटकात त्यांनी मनःपूर्वक सुफलित

करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या हातून महाभारतातील या कथेला अपूर्व

उजाळा देणारे हे नाट्य निर्माण झाले आहे. एक अभिनव पौराणिक साहित्यकृति

म्हणून या नाटकाचा उल्लेख करावासा वाटतो.

 एकलव्याकडे केवळ एक उपेक्षित, विद्या संपादनास नकार दिलेला, तरीही

आपली अजोड गुरूनिष्ठा अंगठा देऊन व्यक्त करणारा असे रूढ दृष्टिकोनातून न

पाहता त्यांनी एकलव्याला एक वेगळे व्यक्तिमत्व आणि भावविश्व प्राप्त करून

दिले आहे, त्याचे जग सर्वस्वी भिन्न आहे असे श्री. खैरे यांनी एकलव्य नाटकात

दिग्दर्शित केले आहे. एकलव्य भावना आणि संवेदना यांचे अकारण स्तोम न माज-

वतां कर्तव्य आणि कर्मनिष्ठा दाखविणाऱ्या माणसाच्या वातावरणातील आहे. त्यांचा

'वंचर' या नावाचा सेवक सुद्धा मोठ्या थाटात वावरतो. समतेचे तत्वज्ञान मोठ्या

सूचकतेने आणि कलात्मकतेने 'एकलव्य' नाटकातून साकार केले आहे. या नाटकात

द्रोणाचार्यांचेही एक वेगळंच व्यक्तिमत्व आढळते. द्रुपदाने केलेल्या अपमानाचा सूड

उगविण्यासाठी ते कमालीचे अस्वस्थ आणि बैचैन झाले होते. अहोरात्र त्यांना अप-

मान सलतो, म्हणून द्रुपदाचा सूड उगवणान्या एका चांगल्या शिष्याच्या शोधात ते


आलेख         ८२