पान:आलेख.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 'ययाती' या उपाख्यानावर आजवर १३ नाटके २ काव्ये आणि २ कादंबऱ्या

लिहिल्या गेल्या आहेत, त्यात विशेष उल्लेखनीय साहित्यकृती म्हणजे कृ. प्र.

खाडिलकरांचे विद्याहरण (१९२३), खांडेकरांची ययाती (१९५९), वि. वा.

शिरवाडकरांचे ययाती आणि देवयानी (१९६६), गिरीश कर्नाडांचे १९७१ साली

अनुवादित झालेले 'ययाती' (मूळ लेखन १९६१) इत्यादी.

 खांडेकरांच्या 'ययाती' चे यश मोजण्याचा एक गणिती मार्ग म्हणजे १९५०

साली लिहिलेल्या ययाती कादंबरीनंतर याच ययाती आख्यानावर आधारीत

मराठी ललित कृतींची झालेली निर्मिती. याचा अर्थ अनेक मराठी लेखकांना

ययाती कथानक भावते ते 'ययाती' च्या आविष्कारानंतरच. उदा. शमिष्ठा-मंगेश

पांडगावकर (१९६०), सं. संजीवनीः मामा वरेरकर (१९६४), देवयानी: ग.त्र्यं.

माडखोलकर (१९६४), सं. ययाती आणि देवयानी: वि: वा. शिरवाडकर१९६६,

ययाती: अनुवादित श्री. रे. भिडे (१९७१), वैरिण झाली सखी : संजीव शेंडे

(१९७१) इत्यादी वरुन 'ययाती' लोकप्रिय व लेखक प्रिय झाल्याचे मराठी ललित

साहित्यात आढळते. महाभारतातील या आख्यानाचे एकूण तीन भाग पडतात.

कचोपाख्यान (विद्याहरणापर्यंत), ययाती आख्यान (पुरुला यौवन देई पर्यंत),

उत्तर यायात (ययातीचे स्वर्ग गमन-पतन). त्यातील ययाती आख्यानावर

खांडेकरांचे लक्ष खिळलेले दिसते. पण त्यांचे लक्ष या आख्यानाकडे वळले यातच

त्यांच्या प्रतिभा संपन्न आणि समृद्ध व्यक्तिमत्वाचा साक्षात्कार घडतो. कारण

महाभारतातील दुष्यन्त शकुंतलाही अन्य उप-कथानकांकडे महान संस्कृत कवींचे

लक्ष वेधले गेले. परंतु त्यांच्या दिव्य प्रतिभेलाही ज्या कथानकाचा विसर पडला

ते खांडेकरांच्या दिव्यचक्षूनी अगदी अचूकपणाने हेरले. त्यातून सर्वांग सुंदर कला-

कृती निर्माण केली. मूळ महाभारतातील कथानकात शर्मिष्ठा निघृण आहे.

शुक्राचार्यांच्या संमतीनेच ययाती देवयानीचा विवाह होतो शर्मिष्ठा राजकन्या

आहे ते ही या ययातीला कळलेले आहे. शुक्राचार्यांनी मूळातील ययातीला ताकीद

दिली आहे. ती शर्मिष्ठेला सहशयनार्थ न पाचरण करण्यासंबंधीची, शर्मिष्ठेच्या

मुलांना देवयानी केवळ चेहऱ्याच्या साम्यातूनच तोंडावळयावरुनच ती ययातीची

मुले आहेत म्हणून ओळखते. नैसर्गिक सत्याचा एक कलात्मक आविष्कार या मूळ

महाभारत कथेत दिसतो. महाभारत कालानुसार धर्म विधीनेच ययातीला सर्वस्वी

अर्पण केलेल्या देवयानीची दासी म्हणून ऋतुमती असतांना याचना करून द्रहयु,

अनु, पुरु या तीन पुत्रांची प्राप्ती शर्मिष्ठेला तत्कालीन समाज व्यवस्थेनुसार

होते. या घटनेने देवयानीचा प्रकोप आणि शुक्राचार्याचा वृद्धत्वाचा शाप ययातीला

भोवतो. शेवटी कन्येच्याच प्रेमाने शुक्राचार्य उ:शाप देतात. 'जरा इतरास देता

येईल.' या कसोटीला फक्त 'पुरु' हाच शर्मिष्ठापुन उतरतो. तोच पुढे राज्याचा


आलेख