पान:आलेख.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अंक   ययाती : त्रिविध दर्शन.

    वि. स. खांडेकर

 १९७४ च्या ज्ञानपीठ या भारतीय सर्वोच्च पारितोषिकास पात्र ठरलेली,

महाभारतातील ययाती आख्यानावर आधारीत 'ययाती' ही प्रदीर्घ कादंबरी वि.स.

खांडेकरांनी १९५९ साली लिहून पूर्ण केली. नव्हे, या कादंबरीने मराठी पौराणिक

कादंबरीच्या क्षेत्रात एका नव्या युगाला प्रारंभ केला. सर्वोच्च बहुमानास पात्र

ठरलेली कादंबरी म्हणून आता ययातीच्या. नव्या आकलनाला, मुल्यमापनाला,

आस्वादाला विशेष बहर येईल ! अभूत पूर्व यश मिळवून रसिक प्रियतेचा उच्चांक

गाठणारी भाऊंची ही स्वतंत्र पौराणिक कादंबरी म्हणजे कादंबरी क्षेत्रातील नवी

परंपरा आहे.

 ययाती कादंबरी म्हणजे भाऊसाहेबांच्या प्रतिभारुपी कस्तुरी मृगाला लाग

लेला एक कस्तुरीचा शोध आहे. 'गुणायंते दोषः' या न्यायाने कल्पना सृष्टीचे

कुबेर म्हणावे इतपत आकर्षण, भाषेचा खास मोह, सुविचारांची पखरण, स्वप्नील

भावविश्व, अद्भुतरम्य रंजन हे सारेच पौराणिक कादंबरीत गुणरुप धारण करिते

झाले. सामाजिक कादंबरीचे क्षेत्र खांडेकरांच्या गरुड भरारी असलेल्या भक्कम

जीवनवादी पंखांना विहरण्यास अपूर्ण बाटू लागले. त्यांच्याच प्रतिमेत सांगायचे

झाल्यास 'पुष्करणीच्या तरंगात सागर लाटांची प्रक्षुब्धता कशी असेल ?' स्वच्छंद

आणि मनसोक्त विहारास त्यांना पौराणिक कथांचा आसमंतच निवडावासा

वाटला.

आलेख