पान:आलेख.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अधिकारी होतो. त्याच्यापासूनच कुरु वंश सुरू होतो. देवयानीचे यदु, तुर्वसु या

चारं पुत्रास ययातीचा शाप भोगावा लागतो. ययाती, देवयानीचा यथेच्छ कामो-

पभोग आपण युद्ध-यशाच्या धुमश्चक्रीत घेऊ शकलो नाही या अतृप्त भावनेने

तारुण्याची मागणी शुक्राचार्यांकडे करतो अशी ही मूळ महाभारत कथा. त्यातील

महत्त्वाच्याच गोष्टींचा परामर्श येथे घेतला आहे.

 आता खांडेकरांना ययाती कशी स्फुरली हे लक्षात घेतले म्हणजे एका श्रेष्ठ

कलावंताच्या कलानिर्मिती प्रक्रीयेची मौज अनुभवास येते. त्यांनी स्वतःच ययाती

कांदबरीच्या प्रस्तावनेत ययाती कादंबरीची जन्मकथा मनःपूर्वक विस्ताराने सांगि-

तली आहे. १९१४ पासूत खऱ्या अर्थाने भाऊसाहेबांना ययाती विषय भिनला.

वस्तुत: अगदी लहानपणी कथा कीर्तनातून ययाती आख्यान त्यांनी ऐकले होते ते

कुठेतरी मनामध्ये रुजले होते. त्या रुजलेल्या बीजानेच प्रौढपणी वटवृक्षाचे रूप

धारण केले असे दिसते.

  ययातीरिव शर्मिष्ठा भतुंबहुमता भव ।

  सुतं त्वमपि साम्राज्यं सेवम् पुरूमवाप्नुहि ।।

'अभिज्ञान शाकुन्तलम्' नाटकातील ४ थ्या अंकातील ७ व्या श्लोकाने खांडेकरांना

अस्वस्थ केले. कण्याचा हा आशीर्वाद 'ययाती' या कादंबरीला ही मिळाला आणि

तिच्या जन्माची प्रेरणा ठरला.

 'ययातीला मिष्ठा जशी प्रिय झाली तशी तू दुष्यंताला प्रिय हो आणि पुरु

ज्या प्रमाणे साम्राज्याचा चक्रवर्ती झाला तसाच तुझाही पुन्न भरत साम्राज्याचा

चक्रवर्ती होवो' असा तो शुभाशिर्वाद आहे. संपूर्ण महाभारत कथेला खांडेकरांनी

भारावून जाऊन वेगळे वळण दिले, मूळातील कथा कालिदासाच्या म्हणण्यानुसार

नव्या संदर्भात पाहिली आणि तेच अधिक ययाती कथेचे विलोभनीय रुप त्यांच्या-

तील कलावंताला मनोमनी पटले. कलाकृती ही एक अंर्तमनांची गूढ प्रेरणा, या

प्रेरणेने खांडेकरांना ययाती शर्मिष्ठेची उदात्त प्रेमकथा दिसली. पण खांडेकरांचे

समाजवादी, मानवतावादी मन एवढ्यावर समाधान पावले नाही, कलांतराने

त्याची ही हुकमत शर्मिष्ठा ययाती प्रणय कथेवर गाजू लागली.

 यंत्र, विज्ञान युग, भयंकर महायुद्धे यामुळे घडून आलेली सामाजिक, राजन

कीय स्थित्यंतरे इत्यादी अनेकविध गोष्टींच्या चिंतनातून त्यांची ययाती साकार

झाली. वि. स. खांडेकरांचा ययाती हा केवळ कामवासनेचा प्रतिक नाही तर जीव-

नातील आणि जगातील सर्व प्रकारच्या मोहाचा व सुन लोलुपतेचा प्रतीक बनतो,

तरीही तो पौराणिक वास्तवाला अबाधित ठेवतो. एक व्यक्ती म्हणून तो जिवंत


आलेख