पान:आलेख.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





  आईच्या पदराआडून

  माकडाला म्हणे, 'हूप !'( भागुबाई भित्री )

'सोनीचा अभ्यास' कवितेतील कल्पना मुलांच्या आवडीची आहे. बाबांच्या

धाकासाठी सोनी अभ्यासाचे नाटक करते खरे पण डुलक्या घेत पेंगत अभ्यास

सुरू होतो आणि मग सगळ्या विषयांची भेसळ होऊ लागते.

  भूगोलात भेटतो तिला

  औरंगजेब बादशहा

  इतिहासात विषववृत्तावर

  पाऊस पडतो बारमहा

काही कल्पना मात्र बालविश्वाचा विरस करतात म्हणून खटकतात

  पुराच्या पाण्याने

  नदी भरून गेली

  रडणारी गाढवे सगळी

  पुरात वाहून मेली (गाढवपणा)

गागं' कवितेतील शेवटच्या ओळी आभाळाच्या किमतीचं' ही बालविश्वात न

सामावणारे आहे.' हिरवे हिरवे ' कवितेत हिरव्या रंगाची दृक् संवेदना कवीने

समर्थपणे प्रत्ययाला आणून दिली आहे. पण मधूनच त्यात 'झरा निळा झुळ

झुळे ' या ठळक उल्लेखाला सहज टाळता आले असते. शिर्षकापासून शेवट-

पर्यंत हिरवारंग दाटलेल्या या कवितेत 'निळा झरा आणि हिरवे हसणे'

खटकते, पण या कवितेने नव्या प्रतिमा विश्वाशी बालगीतातूनही बालांची सांगड

घालून दिली आहे. अवास्तव, रंजकतेचे उदाहरण 'वेड्यांचा बाजार' कविता आहे.

येथे गिऱ्र्हाईक दुकानदार सगळेच वेडे जमले आहेत. पण मुलांसाठी हे पांघरलेले वेड

फार खुलून उठते. एकंदरीत या संग्रहात जमेची बाजू भक्कम आहे.

 या काव्यसंग्रहाची सजावट नासिकचे प्रसिद्ध चित्रकार ज्ञानेश सोनार यांनी.

केली असून कलात्मक मांडणी श्री. सुरेश चौधरी या जळगावच्या कलावंत.

फोटोग्राफ़रने केली आहे. आकर्षक लक्षवेधी व काव्यानुकूल सजावट मांडणीने हा

संग्रह अधिकच खुलून उठतो आणि बालगीतांच्या दालनात महत्त्वाची भर ठरतो.

          X X X

आलेख        ८१