पान:आलेख.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





'जवान वाघोबा' ह्या कतितेत वाघाच्या नैसर्गिक हिंस्त्रपणाचा आणि क्रूर

प्रकृतीचा मजेदार उपयोग करून घेतला आहे. हा वाघोबा दरीतून वर येऊन

सैन्यात जवान म्हणून भरती होतो. आपली तिक्ष्ण नखे बंदूकीचे काम करतील असे

सांगतो. लहानग्यांना ही कल्पना खरोखरीच फार आवडते, गमतीची वाटते.

अशीच सुंदर कल्पना 'रडणारी माती' या कवितेत केलेली आहे. उन्हाने रडणाऱ्या

या मातीला परी भेटते. आणि तिला पाऊस पाडून हवी असलेली मऊ मऊ गवताची

हिरवीगार शाल पांघरायला देते. मातीवरील हिरवळ म्हणजे जणुकाही उन

लागते म्हणून पांघरलेली एक शाल आहे ही कल्पना मोठी रमणीय आहे.

 'सात रंगाच्या सात पोरी' या कवितेतही निसर्गाशी मुलांची गाठ होते.

  पाखरांच्या राजाने

  त्यांना दिले पंख

  पन्या होऊन पोरी त्या

  उडून गेल्या उंच

गजबपूरचा अजब राजा ही एक हलकी फुलकी कविता 'प्रत्येकाने पाळावा ससा'

अशा सात कायदातला एक कायदा या राजाने केलेला आहे. सातपैकी एकच

कायदा सांगितल्याने मुलांना ही कविता अपुरी वाटेल पण अशाच ठिकाणी थांबण्यात

मौज आणि रंगत होती असे वाटते. 'खुजोबा' कवितेत खुजोबाच्या खुजेपणाची गम्मत

'गॅलिव्हस ट्रन्हल' सारख्या जुन्या गोष्टीची आठवण करून देते. अंगठयाएवढी

माणसे आठवतात. 'हसूबाई' ही कविता हुसूबाईच्या सुहास्याने भरलेली आहे.

शेवटी गोजिरवाणे बाळही हसू लागते. झोपाळू आणि आळशी तुळशीच चित्रण

लहान मुलांच्या जवळून परिचयाचे आहे. तिच्या वर्णनात मुलांना स्वतःचे रूप

दिसते. लहान मुलांना नेहमी न आढळणारे प्राणी पाहण्यात फार मौज असते आणि

नेमकेपणाने कवीने हेरून हत्तीचे तोंड कोठे असते ?" या लहान मुलांना

पडणाऱ्या प्रश्नाची सोडवणूक केली आहे. 'गावात आला हत्ती' या कवितेतील

ही कल्पना आनंददायी आहे.

  चिडलेल्या हत्तीने

  आपटली मग सोंड

  तेव्हा मुलांना दिसले त्याचे

  सोंडेखालचे तोंड ( गावात आला हत्ती )

आत्याबाईच्या गोष्टी रंजक आहेत तर ' भित्री भागुबाई ' कवितेत लहान मुलांच्या

भित्रेपणाचे अप्रतिम टीपण आहे.

  उंदीर मामाला भागुबाई

  घाबरायची खूप

आलेख          ८०