पान:आलेख.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






 या काव्यातील 'वनवासी रानफूल' आणि कवी म्हणजे कविवर्य टिळकांच्या

मनाची ती दोन प्रतिके आहेत. हे काव्य म्हणजे परमार्थाने रे टिळकांचे संघर्षमय

अध्यात्मिक आत्मचरित्रच होय. प्रवृत्ती आणि निवृत्ती यांच्यातील सनातन झगडा

फूल आणि कवी यांच्यामधील वादाच्या द्वारे टिळकांनी चित्रित केला आहे.

मूळात १९०४ साली 'कुसुमा-गुच्छ ' या काव्य ग्रंथात 'एका फूलाचा इतिहास'

या नावाने हे प्रसिद्ध झालेले काव्य पुढे १९०९ मध्ये 'वनवासी फूल ' नावाने

प्रसिद्ध झाले. या काव्यातील दीर्घता, रसोत्कटता, मानवी मनाच्या चित्रिकरणाचे

सामर्थ्य, फूल आणि कवी याच्यांतील भावबंध लक्षात घेता ते एक यशस्वी व

लक्षणीय खंडकाव्य ठरते.


तीन   छप्पापाणी


 छप्पापाणी हा जळगाव जिल्यातील नवोदित कवी व चित्रकार श्री. उत्तम

कोळगावकर यांच्या १५ बालगीताचा संग्रह आहे. त्यात वेड्यांचा बाजार,

सोनीचा अभ्यास, गावात आला हत्ती, भागुबाई भित्नी यासारखी बडवडगीत सदृश्य

साना आहेत गाणं, आत्याबाई, आळशी तुळशी या सारखी काही ताल धरून

ठेक्यात म्हणता येतील अशी तालगीतेही आहेत.

 बालसुलभ भावश्विात प्रवेश मिळवून बालांच्याच भाषेत आशयाची

अभिव्यक्ती करणे हे बालगीतकाराच्या यशाचे गमक आहे. त्या दृष्टीने कोळगावकर

यांनी उत्तम यश संपादन केले आहे. ते आपल्या कवितातून लहान मुलांच्या

भावविश्वात मुक्तपणे संचार करतात.

सहजा सहजी मुलांना समजेल अशा

त्यांच्याच भाषेत त्यांचे भावविश्व साकार करतात. त्यांच्या कवितेतील भाव-

कल्पना लहान मुलांना गम्य अशाच आहेत. बालगीतातून अपेक्षित असलेला सोपे-

पणा निःसंदिग्धता त्यात जाणवते. त्यांचा काव्याशय स्वच्छ व सरळं आहे.

शब्दकळाड़ी दाखवण्या जोगे आहे. या शब्दात ताल-लय बद्धता, नादमयता आहे.

ध्वनी आणि चित्र संवेदना आहे. तुळशी, आळशी कळशी, हसूबाई, रूसुबाई, सासू-

बाई, वे चे पाढे या सारखी प्रासात्मकता आहे.

 कोळगावकरांनी काही कवितेत चमत्कृतिपूर्ण आणि चमकदार कल्पना

स्वीकारल्या आहेत तर काही कविता सरळ भावचित्र रेखाटतात, भडक अवास्तवाचा

अतिशयोक्त आधार घेतात. उदाहरणार्थ- गाढवाचा गाढवपणा सांगतांना ते

म्हणतात-


   आवाज एवढा वाढला

   आभाळाला भिडला

   ढगांवर आदळला तर

   पाऊस खूप पडला.

आलेख          ७९