पान:आलेख.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





 वस्तुत: 'कळीचे फूल होते फूलाचे निर्माल्य बनते' ही निसर्गातील एक रुढ

किमया. या नैसर्गिक सत्याचा अप्रतिम विनियोग रे. टिळकांनी या काव्यात केला

आहे. इसापनीतीच्या कथेतील प्राण्यांचे परस्पर संवाद जसे त्या कथेने निर्मिलेले

एक वास्तव समजून आपण त्यातून सूचित होणाऱ्या चिंतनावर, तत्त्वावर आपले

लक्ष केंद्रित करतो तीच स्थिती या काव्यातही आहे.

 'वनवासी फूल'मध्ये कवी आणि फूल ही जणूकाही दोन पाने बनली. त्यामुळे

खंडकाव्यात अभिप्रेत असलेली कथात्मकता येथे अवतरली आहे. खंडकाव्यात प्रत्येक

वेळी माधव ज्यूलियनांच्या सुधारका सारखी घटना प्रसंग आणि व्यक्तिचित्रणांची

गुंफण असावी असे म्हणता येणार नाही. अनिलांच्या भग्नमूर्तीत हो भग्नमूर्तीशी एका

कविमनाच्या भावनोत्कट व प्रक्षोभक पण एकतर्फी संवाद झालेला आहे म्हणून

त्याचे ही स्वरूप वेगळे बनले आहे. पण कालिदासाच्या 'मेघदूता'ला खंडकाव्याच्या

आदर्श मानदंड म्हणून आपण स्वीकारल्यानंतर त्या वस्तूपाठानुसार भग्नमूर्ती, वन-

बासी फूल या दीर्घ चिंतनपर काव्याचाही विचार करावा लागेल. मेघदूताशी वनवासी

फूलाचे साम्य भग्नमूर्तीपेक्षाही अधिक जाणवते. शापित यक्ष मेघाशी संवाद प्रस्था-

पित करतो त्याच प्रमाणे द्विधा मनःस्थितीतील कवी येथे फूलाशी संवाद प्रस्थापित

करतो. आपले मनोगत या निमित्ताने प्रगट करतो.

 विचारांना येथे भावनेचे अंकूर फुटतात. विचारांना कार्य प्रवण करणारे एक

तत्त्व यातून कवीने सांगितले आहे. म्हणून या काव्यातील कवीने बनवासी फूलाला

हळूवारपणे जनसेवेचा सन्मार्ग दाखाविला आहे.

 'अर्वाचीन मराठीतील खंडकाव्ये या प्रबंधात डॉ. ह. कि. तोडमल यांनी

नमूद केल्याप्रमागे रे. ना. वा. टिळक ख्रिस्ती धर्मातील निष्पाप प्रेम व सेवाभाव

या उदात तत्वाकडे झुकले होते. वैयक्तिक निःश्रेयस् निवृत्तिवादी परंपरेतील

भारतीय तत्त्वज्ञान की प्रेम आणि सेवाभाव यावर आधारित प्रवृत्तीवादी (ख्रिस्ती)

धर्माचार हा संघर्ष त्याच्या मनात ख्रिस्ती होण्यापूर्वीपासून चालू असावा, या

याच्या अध्यात्मिक आंतरिक संघर्षाचे उत्कट प्रत्यंतर या काव्यात येते.

 टिळक ख्रिस्ती होण्यापूर्वीच सन्याशी झाले होते आणि पुनश्च संसारातही

आले होते. ख्रिस्ती झाल्यानंतर आयुष्याच्या अखेरीस ख्रिस्ती धर्मातील प्रॉटेस्टंट

पंथांना संमत नसलेला सन्यासही त्यांनी घेतला. 'देवाचा दरबार ' ही संस्था

१९१७ साताऱ्याला स्थापना केली यावरून वनवासी फूल काव्यात व्यक्त झालेली

आंतरिक संघर्ष टिळकांच्या आयुष्याखेरिसही चालू होता. बनवांसी फूलाच्या

आकलनास उपयोग होऊ शकेल अशी ही माहिती वस्तुस्थिती आहे.


आलेख             ७८