पान:आलेख.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





पद्धती असते. या पद्धतीने पाहाणी करून प्रत्येक कर्णविषयक साहित्यकृतीला साभि.

प्राय, अर्थपूर्ण अशा शीर्षकात गोवण्याचा, पकडण्याचा प्रयत्न सुशीला पाटील यांनी

केला आहे. या त्यांच्या भूमिकेने श्री. हरदास आठवले, डॉ. वाळिंबे यांचे (काही

अंशी गो. नी. दांडेकर, अल्पांशाने शिवाजी सावंत यांचे) कर्ण महाभारतानुसारी

असल्याचा निर्णय दिला आहे तर अन्य ललित लेखन प्रासंगिक, काल्पनिक, विविध

दृष्टींतून रेखाटलेली कर्णाची कल्पनाचित्रे आहेत असा निर्वाळा त्यांनी दिला आहे.

शेवटी त्यांनी उपसंहारात गुणदोषांची परिसीमा गाठणारा स्वतःच्या दृष्टिकोनातून

कर्णं टिपला आहे
.

 या पुस्तकाची सगळयात मोठी जमेची बाजू म्हणजे प्रा.नरहर कुरुंदरकर

यांची त्यांच्या अनेक प्रस्तावनांप्रमाणेच याही पुस्तकाची प्रस्तावना ! तो अनेक

दृष्टींनी अभ्यासनीय व चिंतनीय आहे. महाभारताकडे पाहाण्याचा दृष्टिकोण कर्ण-

विषयक चिंतन, व्यासंगपूर्ण अधिकाराने तीमधून साकार झालेला आहे. या विचार-

परिप्लुत संयुक्त प्रस्तावनेचा स्वतंत्रपणे परामर्श घ्यावा लागेल.


दोन : वनवासी फूल


 'वनवासी फूल' हे रेव्हरंड टिळकांचे प्रसिद्ध काव्य खंडकाव्य, दीर्घकविता,

चितनिका या नावाने ते मराठी साहित्यात उल्लेखिले जाते. 'बनवासी फूलाची

मूळ प्रकृती खंडकाव्याची आहे हे आदर्श खंडकाव्य कल्पनेतूनच सूचित होते.

 या काव्यात व्यक्तीच्या अंतरंग दर्शनाला, मनोविश्लेषणाला विशेष प्राधान्य

दिले आहे. त्यात कथा निवेदनापेक्षा मानवी भावनाविष्काराला महत्त्व प्राप्त झाले

आहे. विचार आणि भावसत्य; कविमनातील भावमधूर स्पंदन येथे साकार झाले

आहे.

 कवि रुपातील 'मी' या काव्यात सर्वत्र संचार करतो. या कवीचा पुष्पाशी

सुसंवाद प्रस्थापित होतो. कविसृष्टीतील हे वनवासी फूल बोलते. फूल आणि कषी

या दोन व्यक्ती स्वतःच्या जीवनविषयक कल्पना आपसातील संभाषणातून क्रिया

प्रतिक्रियेच्या स्वरूपात व्यक्त करतात. अखेरपर्यंत फूल अट्टहासाने आपले म्हणणे

पटवून देण्याचा प्रयत्न करीत राहते. शेवटी कवीच्या अश्रूचे मोल त्याला उगमते.

त्यातच ते फूल स्वतःला झोकून देते.
आलेख            ७७