पान:आलेख.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





जय नावाचा इतिहास आहे', शं के पेंडसे यांचे 'महाभारतातील व्यक्तिदर्शन'

डॉ. रा. शं. वाळिंबे यांचे 'राधेय कर्ण' इत्यादी साहित्याचा त्याची प्रकृती लक्षात

घेऊन विचार व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे श्री. वि. वा. शिरवाडकरांचे 'कौंतेय',

दुर्गा भागवतांचे 'व्यासपर्व', गो. नी. दांडेकरांचे 'कर्णायन', इरावती कर्वे यांचे

'युगांत', शिवाजी सावंत यांची 'मृत्युंजय', आनंद साधले यांची 'महापुरुष' या

ललितकलाकृतींना, ललित कलाकृतीच्या प्रतिज्ञेतून अवतरलेल्या ललितकृती म्हणून

काही वेगळा न्याय देता येतो का हे पाहाणे आवश्यक होते. कारण प्रेमा कंटक यांचे

'महाभारता: एक मुक्त चिंतन' आणि प्राचार्य आठवले यांचे 'महाभारतातील वास्त-

वदर्शन' यांची आणि शिवाजीराव सावंतांच्या 'मृत्युंजया'ची प्रकृती मूलतः भिन्न

आहे. ललितलेखकाचे स्वातंत्र्य आणि ललितकृतीचे वेगळेपण लक्षात घेतले म्हणजे

त्यांच्यावर घेतले जाणारे आक्षेप घेता येणार नाहीत.

 प्रा.सुशीला आठवले यांच्या विवेचनात १९७१ नंतरची कर्णविषयक साहित्य

संपदा नाही. त्यात म. रं. शिरवाडकर यांचे 'हस्तिनापूर' रणजित देसाई यांचे

'राधेय', विजय देशमुख यांचे 'सूर्यपुत्र', कै. मधु भोसले यांचे 'जीवनभास' या

लेखताचा समावेश होतो. त्यांच्या अभ्यास कक्षेत ती घेतलेली नसली तरी बाळ

शास्त्री हरदासांचे 'महारथी कर्ण' आणि कै. बा. सी. मर्ढेकर यांची 'कर्ण' ही संगी

तिका (नटश्रेष्ठ आणि चार संगीतिका) यांचा समावेश आवर्जून व्हायला हरकत

नव्हनी.

 महाभारताकडे पाहाण्याचे वेगवेगळे दृष्टिकोण आहेत आणि ते अटळ अस

णारच असेच महाभारताचे स्वरूप आहे. पौराणिक ललित कृतींच्या निर्मितीमध्ये

पौराणिक वास्तवाला जिवंत करून मानवीमनाचे आणि जीवनाचेच दर्शन अभिप्रेत

आहे. तिथेही कर्णातील 'माणसा'चाच शोध घ्यायचा असतो. यादृष्टीने कर्ण विषयक

ललितकृतींवर आक्षेप न घेता ते स्वतंत्र भाष्यकार आहेत. कर्णच्या व्यक्तिरेखेच्या

निमित्ताने ते स्वानुभूती कलात्म पातळीवरून अभिव्यक्त करतात किंवा नाही हा

महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक कलावंताच्या मनात शिरते, त्याला प्रतीत होते

जाणवते, तीच त्याची व्यक्तिरेखा असते. रणजित देसाई 'राधेय'च्या प्रस्तावनेत

म्हणतात त्या प्रमाणेच 'प्रत्येकाच्या मनात एक कर्ण दडलेला असतो. त्यासाठी

महाभारताची पाने उलटण्याची आवश्यकता नाही आपल्या मनाची चार पाने उल-

टलीत तरी चालतील' वस्तुस्थिती असते. कथा, घटना-प्रसंग आणि त्यांतून मनात

शिल्लक राहाणारी व्यक्ती ही शेवटी रसनिर्मिती काव्यगत भावनिर्मितीची 'आलंबन'

च असते. कथा अभिनयनानेच विभावनानुकूल बनते. तेव्हा ललित कलाकृतींना

महाभारताला धरून आणि महाभारताला सोडून असे तपासण्याची ही एक रीत

आलेख            ७६