पान:आलेख.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे







तोन  टिपा अकरा




एक: मराठी साहित्यातील कर्ण


 प्रा. सुशीला पाटील यांनी २६ मे १९७३ ते १६ ऑक्टोंबर १९७३ या

कालावधीत 'औज' साप्ताहिकातून प्रकाशित केलेली महाभारतातील कर्ण विषयक

साहित्यावरील लेखमाला म्हणजे 'मराठी साहित्यातील कर्णं' हे पुस्तक होय. १९५१

पासून १९७१ या वीस वर्षाच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या कर्ण विषयक संशोध-

नात्मक, ललित गद्यात्मक, चरित्रपर, कादंबरी, नाटक, सामाजिक भौतिक दृष्टीतून

लिहिलेले, चिंतनपर अशा विविध स्वरूपी साहित्याचा विशिष्ट दृष्टिकोणातून

मूल्यमापनाचा प्रयत्न केला आहे. प्रा.सुशीला पाटील यांनी स्वीकारलेला दृष्टिकोण

हा परंपरागत शुद्ध महाभारतीय आहे असे म्हणता येईल.

 प्राचार्य अ. दा. आठवले, डॉ. रा. शं. वाळिंबे, बाळशास्त्री हरदास यांच्याशी

मिळताजुळताच लेखिकेचा दृष्टिकोण आहे. एकदा स्वीकारलेल्या गृहितांशी, दृष्टि

कोणाशी इमान राखून त्यांनी आपले मूल्यमापन सादर केले आहे हे लेखिकेचे

अभिनंदनीय यश आहे.

 पण त्यांनी स्वीकारलेला दृष्टिकोण हा कर्णविषयक सर्वच साहित्यकृतींना

एकाच मापाने मोजणारा असल्यामुळे त्यांचे गृहीत सर्व साहित्यकृतींना न्याय देऊ

शकले असे वाटत नाही.

 अललित किंवा वैचारिक चिंतनपर समीक्षणात्मक जन्माला आलेल्या साहि-

त्याचा- उदा० बाळशास्त्री हरदास यांचा व्याख्यान ग्रंथ, आनंद सांधले यांचा 'हा



आलेख           ७५