पान:आलेख.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






 हरिभाऊ हे यशस्वी ऐतिहासिक कादम्बरीकार म्हणून मान्यता पावले

आहेत. त्यांची ऐतिहासिक कादंबरी ही अद्भुतता आणि वास्तवता यांच्या

मधील दुवा साधणारी आहे. अद्भुत रम्यतेच्या पार्श्वभूमीवरच त्यांनी ऐतिहासिक

कादंबरी लिहिली. त्यामुळे ती जास्त आकर्षक ठरली आहे. अत्यंत मर्यादित असे

ऐतिहासिक साधन असून सुद्धा त्यांना सुयश मिळाले; मात्र ऐतिहासिकतेला त्यांच्या

कादंबऱ्यात दुय्यम स्थान आहे.

 त्यांच्या ऐतिहासिक कादंबरीतील वातावरण निर्मितीची किमया अपूर्व आहे.

आपण प्रत्यक्ष त्या वातावरणातच वावरत आहोत. असा भास निर्माण होतो इतके

ते वातावरण यशस्वी आणि उठावदार करतात.

 हरिभाऊंचे यश हे त्यांनी चित्रित केलेल्या तत्कालीन समाजाच्या विहंगम

दृष्यात आहे. त्यांचे या बाबतचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतःच्या काळांतील विचा-

रांच्या धाग्याचेच प्रतिपादन केलेले आहे. स्वतःच्या जीवनांतील केलेल्या प्रति-

पादनातच त्यांचे सामाजिक यश आहे. कलादृष्टी आणि सामाजिक दृष्टी यांचे

मनोज्ञ एकीकरण त्यांच्या कादंब-यात दृष्टोत्पत्तीस येते. ह्यामुळेच त्यांच्या कादं-

बऱ्या ह्या कला दृष्ट्या श्रेष्ठ दर्जाच्या ठरतात.

 हरिभाऊंच्या कादंबऱ्या जुनाट वाटतात हेही त्यांच्या मोठेपणाचेच गमक

आहे. कारण त्यांचे चित्रण यशस्वी आहे जिवन्त आहे; म्हणून आज ते जुनाट वाटणे

सहाजिकच आहे.



              x x x
























आलेख             ७४