पान:आलेख.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




 हरिभाऊंनी एका विशिष्ठ समाजाचे चित्र रेखाटले. समाजस्थितीचे खरेखुरे

दर्शन घडविले आणि अनेक सामाजिक प्रश्नांना, समस्यांना वाचा फोडली. हरिभाऊंची

पात्रे म्हणजे समाजातील प्रतिनिधिक व्यक्तीच ! त्यांच्या 'यमू' च्या ठिकाणी

समाजाचे सापेक्षतः फार मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व असलेले दिसते. हरि-

भाऊचा लक्षणीय विशेष म्हणजे त्यांनी केवळ समाजाचे दोषच आपल्या कादंबऱ्यांत

चित्रित केले नाहीत तर त्या समस्यांची सोडवणूक केली आहे. त्यावर उपाय सुच

वून 'समाजाचे आदर्श' सांगितले आहेत.

 हरिभाऊंच्या कांदबयांतील कुटुंब ही तत्कालीन कुटुंब पद्धतीचेच चित्रण

आहे त्याचे कुटुंब हे अनेक व्यक्ती स्त्री-पुरुषांनी भरलेले आहे. 'खटल्या' च्या ह्या

घराचे चित्रण हरिभाऊ यथार्थ करतात. हरिभाऊंच्या कादंबन्यातील आकर्षकता

ही त्यांनी रेखाटलेल्या अतिशय साध्या, वास्वत आणि मोहक घरघुती जीवनातच

आहे. त्यांच्या कादंबऱ्यातील पात्रे ही तत्कालीन महाराष्ट्रीय कौटुंबिक जीवनांतील

विविध अंगाची प्रतिनिधी रूपे आहेत. शंकर मामंजी, ताई, बाळासाहेब, यमूची

आई यातील कोणतेही पात्र तत्कालीन कौटुंबिक जीवनातील एका विशिष्ट अंगाचे

यथार्थ दर्शन घडविते. पण लक्षात कोण घेतो ? या कादंबरीतील शंकर मामंजीचे

चित्र घेतल्यास ती केवळ एक व्यक्ती नसून त्या काळच्या ढोंगी व जुलमी अशा

रुढींच्या दासांचा तो एक नमुना आहे. त्याच प्रमाणे 'उष:काल' चा नायक

"नानासाहेब" हाही तत्कालीन तरुण मनाचा निदर्शक आहे. मध्यम वर्गीय समा-

जातील कौटुंबिक जीवनाचे चित्रण करण्यासाठी त्यांनी अशा अनेक स्त्री-पुरुषांचे

नमुने आपल्या कादंबरीत रेखाटले आहे. त्या काळाचे स्वभाव विशेष त्यात आढ

ळतात. त्यांचे व्यक्ति चित्रण जिवंत असून स्थळ काळाशी संबद्ध आहे.

 हरिभाऊंच्या कांदबन्यांतील स्त्रियांची चित्रणे ही प्रातनिधिक स्वरूपाची

आहेत. त्यांच्या कांदबन्यांतील स्त्रिया 'परवश' चित्रित केलेल्या आढळतात. एक

प्रकारे 'संकट मग्न तरुणी चेच चित्र त्यांनी विशेषतः अंतिहासिक कादंबऱ्यांत

रेखाटले आहे. त्या स्त्रिया ह्या प्रेयसी प्रियकराच्या किंवा प्रणयी जोडप्याच्या

स्वरूपात आपल्या डोळयात भरत नाहीत तर अत्यंत शोचनीय परिस्थितीत, संक

टात सापडलेल्या दिसतात, त्या स्त्रिया ह्या विशिष्ट परिस्तितीच्या निदर्शक ठर

तात. हरिभाऊंची ती स्वस्थिती जाणण्याची भूमिका आहे असे वाटते. इतर अनेक

कादंबरीकारा प्रमाणे स्त्रीदास्य विमोचनाचे रूपांतर पुढे प्रणयात हरिभाऊ करीत

नाहीत. त्यांच्या कादंबरीतील तरुण काहीही किंमत न घेता त्यांची सुटका करतात

म्हणजे त्यांचे हे चित्रण एक प्रकारे निरपेक्षच झालेले आहे असे म्हणता येईल.

आलेख            ७३