पान:आलेख.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






लीच पाहिजे. अखेरीस ज्याला ती व्यक्ती जशी प्रतीत होईल तीच त्याची व्यक्ती

असेल. शेवटी त्या लेखकाच्या मनात शिरेल तीच त्याची खरी व्यक्तिरेखा.

व्यक्तीप्रमाणेच घटना-प्रसंगाच्या निमित्तानेही लेखकाचे अनुभवविश्व त्याला

साकार करता येईल. काव्यगत व्यक्ती घटना-प्रसंग या अंतिमतः 'आलंबन' च

आहेत. भरताने आपल्या रसचर्चेत नाटयगत व्यक्तींना आलंबनविभावच मानलेले

दृष्टोत्पत्तीस येते. तेव्हा या काव्यगत व्यक्तीच्या निमित्ताने साकार होत असलेले,

माणसाच्या आणि त्याच्या जीवनाच्या अंतरंगाचे मर्म आणि धर्म महत्त्वाचे ठरते.

 वाङ्मयीन दृष्टिकोनाच्या कक्षेत असा लेखक बेजबाबदार वगैरे मग ठर-

ण्याचे कारण नाही.

 तात्पर्य कविगत न्यायाचे (Poetic Justice) भान ठेवून, कलांतर्गत

सुसंगतीची बूज राखून, रसिक हृदयाला पटू शकेल, असे सारे ललित लेखक विमुक्त

मनाने लिहू शकतो. मग ते वि. वा. शिरवाडकरांचे 'कौंतेय', विजय तेंडूलकरांचे

'घाशीराम कोतवाल' किंवा विद्याधर पुंडलिकाची 'सती' वा अगदी अलिकडील

रणजित देसाई यांची 'राधेय' असो.


तीन : हरिभाऊंच्या कादंबऱ्या

 मराठी कादंबरीचा जन्म अद्भुतातच झाला आणि सुरवातीचे कादंबरी

वाङ्मय याच अद्भुत रम्यतेने व्यापून राहिलेले होते. साहित्याच्या क्षेत्रातील बदल

हा अचानक, एकदम असा कधीच घडून येत नसतो. तर नकळत का त्याची अस्फुट

बीजे पूर्व वाङमयात कुठतरी रुजत असतात. अदभुत कादंबरीच्या या युगातही

वास्तवतेच्या सूक्ष्म छटा दिसून येतात. कादंबरीचा अद्भुत प्रवाह आणि त्या.

बरोबरचाच वास्तवतेचा क्षीणप्रवाह हाच क्षीण असलेला प्रवाह १८८५ ते १९२०

या कालखंडात विस्तृत झाला. या कालखंडात हरिभाऊ हे अग्रेसर ! त्यांनी सुरवा

तीला 'मधली स्थिती' पण लक्षात कोण घेतो ? ह्या सारख्या कादंबऱ्या लिहून

वास्तवतेच्या ह्या क्षीण प्रवाहाचे पात्र विस्तृत केले. मराठी कादंबरीत त्यांनी ही

लक्षणीय भर टाकून 'हरिभाऊ युग' सुरू केले.

 हरिभाऊची कादंबरी ही सर्व दृष्टीने सामाजिक कादंबरी म्हणता येते. स्वतः

हरिभाऊ हे एक समाज सुधारक होते. त्यांनी समाजाची नाडी ही चांगली हेरली

होती. त्यांची सामाजिक कादंबरी ही वस्तुस्थितीदर्शक होती. त्यांचा स्वतःचा

सामाजिक दृष्टिकोन त्यांनी आपल्या कादंबऱ्यात आणला तत्कालीन समाजाचे

'खरेखुरे' हृदयस्पर्शी चित्र हे त्यांच्या सामाजिक कादंबातून दिसून येते.

७२             आलेख