पान:आलेख.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






घ्यावाच लागतो, असा याचा अर्थ दिसतो. ललित लेखक आणि त्याने आपल्या

ललित लेखनात घ्यावयाचे स्वातंत्र्य याला कोणत्याही प्रकारची बंधने (प्रामुख्याने

कलाबाह्यच बंधने लादण्याचा यत्न होतो) धरबंद असूच नये, असे आता नव्याने

वाटू लागले आहे. व्यक्तिचित्रणात्मक, वास्तववादी, सामाजिक, एतिहासिक,

पौराणिक इ. सर्वच प्रकारच्या साहित्याच्या संदर्भात हा लेखन स्वातंत्र्याचा प्रश्न

नव्याने निर्माण करता येईल.

 पहिल्यांदा आज एक गोष्ट आपण मान्य केलेली आहे की, प्रत्येकाला लेख

नाचा हक्क आहे, ज्याला जो भावेल, ते तो लिहू शकतो. भारतीय घटनेनेच

दिलेले स्वातंत्र्य आहे, हे सर्वांना मान्य आहेही ! पण याचा पुढचा प्रश्न ललित

लेखकांनी आपल्या ललित लेखनात घ्यावयाच्या स्वातंत्र्याचा आहे.

 मानवी भाव जीवनानुभवातील घटना, प्रसंग, व्यक्ती यांच्याबद्दलच्या लेख-

काच्या कलात्मक निर्मितीला अनुकूल असलेल्या व्यक्तित्वाच्या चिंतनातूनच

साहित्य कृती जन्मते. लेखकाचे हे संस्कारित व्यक्तिमत्वच साहित्यकृतीचा फार

मोठा आधार असते, असे मानायला हरकत नाही. शुद्ध वास्तववादी पौराणिक

आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून ललित लेखकांवर आक्षेप घेणाऱ्या व त्यांना दूषण

देणाऱ्या टीकाकारांचा एक गट अस्तित्वात येऊ पाहात आहे असे दिसते. आणि

ललित लेखकांना त्यांच्याशी सतत झुंज द्यावी लागणार असेही दिसते.

 परंपरागत दृष्टिकोन स्वीकारून लेखनकृतीबद्दल अनुदार अशी टीका त्यांच्या

विशिष्ट दृष्टिकोनातून अशा वेळी केली जाते असे म्हणता येईल असे एकदा

ललित लेखकांना धारेवर धरायचे ठरलं तर शुद्ध वास्तवाचा तपशील घेऊन कथा

कादंबऱ्यांची छाननी करून लेखकाच्या कल्पित भावविश्वालाही नाकारता येईल.

पण ते एक कल्पित भावविश्व आहे त्याचे नियमन वेगळे आहे हेच लक्षात घेतले

गेले पाहिजे. साहित्य सृष्टीचे वेगळेपण एकदा लक्षात घेतले की मग कलांतर्गत

सुसंगतीच तपासली जायला हवी. लेखक ललित लेखन धर्म पाळतो की नाही;

त्यांने लिहिलेलं कविगत न्यायाने (poetic justice) समर्पक, संयुक्तिक

किंवा नाही हा विचार महत्त्वाचा ठरतो.

 आनंदवर्धनाने म्हटल्याप्रमाणे कथा अभिनयाने सांगितली गेली किंवा नाही

हैं प्रश्न मग महत्त्वाचे ठरतील. प्रतीयमान होणारे, विभावणारे (convensing)

हे तारे व्हायला हवे याच गोष्टीवर लक्ष केंद्रित होईल.

 तेव्हा ललित लेखकांना एखादी पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिकदृष्ट्या

महत्त्वाची व्यक्तिरेखा घेऊन तिच्या निमित्ताने आपले अनुभवविश्व जर साकार

करावयाचे असेल तर संपूर्ण मुभा, स्वातंत्र्य निदान तशी मोकळिकही त्यांना अस

आलेख           ७१