पान:आलेख.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





 व्यक्तीची, व्यक्तीच्या जीवनातील घटनाप्रसंगांची, गुण, स्वभाव विशेषांची

प्राक्कथा द्योतक असते त्यातूनच ती घडते. प्रतीक (Symbol ) म्हणून या

प्राक्कथेचा वापर होतो पण त्याबरोबरंच प्रतिमा (Image) म्हणूनही तिची

साररूपाने योजना होते. यामुळेच योजिलेल्या अशा प्राक्कथेला नवा संदर्भ, नवा

अन्वयार्थ आणि नवा प्रकाश लाभतो. आणि त्या प्राक्कथेतून जीवनाशय-मानवी

स्वभाव नव्याने प्रकाशात येतो. परस्परांना उजाळा देणारे हे कलात्मक अनुभूती

आणि प्राक्कथेचे नाते आहे. प्राक्कथांमध्ये प्रत्ययकारिकत्वाचे आणि कलात्मक

पातळीवरून अनुभव व्यक्त करण्याचे सामर्थ्य आणि शक्यता अधिक आढळते;

म्हणूनच या प्राक्कथांचे आवाहन फार प्रमाणात आज वाढलेले आढळते.

 प्राक्कथांत मानवी मूलभूत भावनांचे दर्शन घडविण्याचे स्थायी भावांना

जागृत करण्याचे सामर्थ्य आहे. उपलब्ध लोकसाहित्याचे एक महत्त्वाचे दालन

या कथांनी समृद्ध आहे. आदिमानवात माणसांचे संस्कारहीन परंतु अस्सल रूप

दिसते तसे या प्राक्कथांत ( आदिकथात ) मानवी स्वभावाचे आणि जीवनाचे

काहीसे स्थूल- रांगडे परंतु अस्सल दर्शन घडते. अद्भुततेचा आणि शाश्वततेचा

सुंदर मिलाफ येथे असतो. अखंडित-अव्याहत परंपरेने या प्राक्कथा आपल्यापर्यंत

मालेल्या आहेत. त्यात व्यक्तीपेक्षा समूहाचे मन प्रतिबिंबित होताना दिसते. त्या-

मुळेच कदाचित नैसगिक भाव-भावनांचे साधारणीकरण तेथे आपोआपच साठवले

जाते. होत जाते. म्हणूनच या प्राक्कथांना सदासर्वकाळ मोल राहणार आहे असे

वाटते.

 शब्दशक्तीपैको व्यंजना या शब्दशक्तीची काव्यानुकूलता सर्वात अधिक

मानली जाते. प्राक्कथा समर्थपणे आशयाभिव्यक्तीसाठी विशेष अनुकूल आहेत.

ललित लेखकाला स्थलकालपरत्वे नवे नवे रंग भरून आपल्या प्रतिभेच्या स्पर्शाने

प्राक्कथेचे सौंदर्य अधिकच खुलविता येते. विकसित करता येते. हे करण्याचा प्रयत्न

आजच्या लेखकांचा आहे; या प्रयत्नातूनच प्राक्कथाना नवे चैतन्य लाभते. माण-

साच्या वाढत्या अपेक्षा आणि गरजा भागविण्याचे सामर्थ्य, जे मुळातच असते ते

अधिकच वाढते. त्यामुळे या प्राक्कथाही फुलतात - बाढतात.

 प्राचीन काळी माणसाच्या हाती आलेली जीवनसत्ये प्राक्कथांत साठवलेली

आहेत. ही जीवसृष्टीतील सारी सत्ये चिरंतन आहेत म्हणून चिरंतनाचे चिंतन

करणाच्या साहित्य सृष्टीला तिचे नेहमीच आकर्षण वाटत राहणार आहे.

दोन : लेखन स्वातंत्र्य

 ललित लेखकांच्या लेखन स्वातंत्र्याचा पुनर्विचार करावयाची आता वेळ

आली आहे. कोणताही वाङ्मयीन प्रश्न हा विशिष्ठ कालावधीनंतर पुन्हा चर्चेला


आलेख            ७०