पान:आलेख.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





 तरी संशोधनाचा हेतू, प्रक्रिया आणि फलित यात विशेष फरक नसतो.

संशोधनात नवीन तत्त्वांचे संशोधन उपलब्ध सिद्धान्ताचे नव्या स्वरूपात प्रतिपादन

आणि योग्य त्या निष्कर्षांपर्यंत पोहचण्याची जिद्द हवी. स्वीकृत अभ्यास विषयाला

आपण किती व काय हातभार लावला हे त्यातून स्पष्ट व्हायला पाहिजे. आपल्या

विषयाच्या अनुषंगाने त्या संदर्भातील ज्ञानकक्षा विस्तृत करता आल्या पाहिजेत.

त्यासाठी चांगली प्रतिपादन शैली आत्मसात केली पाहिजे. त्यासाठी निरीक्षण व

परीक्षण केले पाहिजे त्यातून प्रतिभेला गवसलेले सत्य केलेले तत्त्वशोधन साकार

करता आले पाहिजे. आपण केलेल्या संशोधनाकडे भावी संशोधक मार्गदर्शनासाठी

पाहणार आहेत याची जाणीव ठेवूनच हे सारे संशोधन व्हायला पाहिजे.


                       xxx
























आलेख                          ६८