पान:आलेख.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





 कारण अनेक अधिकारी व्यक्तींच्या अपेक्षा, पद्धती, कल्पना, मांडणी स्वतंत्र

असतात. त्यामुळे आपण गांगरून न जाता निश्चयानेच आपला मार्ग चोखाळला

पाहिजे.

 मी 'महाभारतावर आधारित अर्वाचीन मराठो ललित साहित्य' या

प्रबंधाच्या प्रास्ताविकात हा अभ्यास करणाऱ्या कोणकोणत्या पद्धती संभवतात ते

सांगून विशिष्ट पद्धतीच कां अंगिकारिली याचा उलगडा केला आहे. संशोधनाच्या

अनेक परी संभवतात पण अंतीमत: ज्याने त्याने आपला सोयीचा मार्ग

अवलंबावयाचा असतो. नव्या संशोधकाने न मळलेली वाटच बहिवाटीत

आणावयाची असते.

 महाभारतात प्राधान्य लाभलेल्या व्यक्तींची नावे प्रबंधातील प्रकरणांना

दिली. या व्यक्तिप्रधान प्रकरणांमध्ये सर्वच महत्त्वाच्या साहित्यकृतींचा अभ्यास

झाला पाहिजे ही भूमिका स्वीकारली. अभ्यासाची व्याप्ती आणि विस्तार जस-

जसा वाढत जातो तसतशी एकेक गोष्ट वगळण्याची कला आपण नीट आत्मसात

केली पाहिजे. महाभारतात विपुल व्यक्ती आहेत, मग त्यातील महत्वाच्याच व्यक्ति-

रेखा घ्यावयाच्या, उपाख्याने आहेत. मग फक्त ययाती उपाख्यानच नमुना म्हणून

अभ्यासावे कारण या उपाख्यानावर मराठीत विपुल साहित्य निर्मिती झाली आहे.

भाषांतरित रूपांतरित बाल साहित्य वगळावयाचे ठरविले. या शिवाय सर्वच

साहित्य कृतींचा विस्ताराने परामर्श घेणे अवघड होते म्हणून फक्त निवडक

गाजलेल्या व फसलेल्या साहित्यकृतींचाच विचार करावा लागला. विस्तार

भगास्तव हे सारे करावे लागले तरी प्रारंभी गृहीत धरलेला १८५० ते १९५० हा

कालखंड १९७५ पर्यंत पुढे वाढवावा लागला. कारण महत्त्वाच्या साहित्य कृतींची

निर्मिती स्वातंत्र्योत्तर कालखंडातच झालेली आहे. उदा. कौतेय, यताति व्यासपर्व

युगान्त, यताति आणि देवयानी, महस्यगंधा, मृग्युंजय, जीवनव्यास, सूर्यपुत्र, राधेय

इत्यादी. अशावेळी अभ्यासाची कक्षाही वाढविणे भाग बनते. हे सारे या

अनुभवातून तावून सुलाखून निघालेल्या मार्गदर्शकांच्या सल्याने हे करावयाचे

असते. हाच खरा मार्गदर्शकांचा प्रबंधाला लाभणारा स्पर्श असतो.

 काहीवेळा अभ्यासकाच्या मतांचा आणि संशोधन भूमिकेचा मार्गदर्शकाला

व्रासही होतो. पण त्याला चर्चा वादविवाद हा मार्ग असतो. 'वादे वादे जायते

तत्त्वबोधः' अशी ह्या वादाची फलश्रुती व्हायला हवी. अभ्यासात बुडी घेतली

म्हणजे मग मार्गं गवसतोच उपरोक्त विवेचन कलाशाखेतील वाड्मयीन विषया-

वरील संशोधनास उपयुक्त ठरेल पण विज्ञान, वाणिज्य, शिक्षण, समाजशास्द्ध,

या ज्ञानशाखेतील विषयांच्या संशोधनात काही प्रमाणात वेगळेपणा आढळेल



आलेख           ६७