पान:आलेख.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





गाभ्रे,पुराणमतांच्या शेवळांनी,समुद्राच्या काठोकाठ, गुदमरली रात्र, डोळे फुट-

लेली संध्याकाळ, कुटिल चांदणे, अक्वारे जिया, सोडियमची कांडी, फॉस्फरस, इ.

शब्द कवीच्या वेगळ्या शब्द कळेची जाणीव करून देतात.

 श्री वामन इंगळे यांची या संग्राहाला लाभलेली प्रस्तावना या कविते विषयी

फारशी बोलतच नाही. ती फारच मोघम बोलते.

 मला वाटते नीलकान्त चव्हाण यांच्या कवितेचे यश त्यांच्या अंतर्मुख कवि-

वृत्तीत आणि जीवनाकडे कमालीच्या तटस्थपणाने पाहणान्या दृष्टिकोनात समा

वले आहे म्हणूनच त्यांची कविता नुसती 'दलित कविता' राहात नाही. ती कविता

बनते.


           x x x












आलेख           ६४