पान:आलेख.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





  आणि अबोलीचे । मुक्त हास्य ॥

  युगंधर माझा | झुंजला एकटा

  दिल्या सोन वाटा । पांथस्थाना ॥

 'डोळे फुटलेली संध्याकाळ' वर्णन करताना त्यांच्या प्रतिभेला असाच बहर

येतो.

  पक्षाच्या पंखावरील चकाकणाऱ्या

 रंगी बेरंगी इंद्रधनुष्याच्या कमानी' (पृ. १३) दिसू लागतात असे असले

तरी चव्हाणांच्या काही कविता' मधील आशय संदिग्ध राहतो ही संदिग्धतता अनु

भवाच्या गुंतागुंतीतून आणि गुढांमधून आलेली असावी. 'पान' 'तो' 'चालणार नाही'

'सत्यमेव जयते' 'निरोप' इत्यादी कविता या संदर्भात उल्लेखिता येतील. येथे गूढ

तसेच कायम राहते.

 कोणत्याही कवीची कविता हो त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रतिभेचा आणि

अनुभूतीचा अविष्कार असते अशीच चव्हाणांची ही कविता लक्षात घ्यावी लागते.

प्रकाशाच्या शोधासाठी त्यांनी कवितेची वाट चोखाळलेली दिसते. पण हा प्रकाश

त्यांना काही केल्या सापडतच नाही म्हणूनच-

  'पाहिजे मला दाट अरण्याला

  तुडवून जाणारा एक प्रकाश रस्ता '

 असे कवी म्हणतो. पण या समाजात पाहिजे तसे मिळत नाही हीच या

कवीची खरी वेदना आहे. 'फुलारू मनाचा हा माळी कुठे सापडतच नाही.'

 'रमणीयार्थ प्रतिपादक: शरदः। ' या कवीच्या शब्द कळते फारसे प्रत्ययाला

येत नाहीत. काव्यात्म प्रतिक्रियाही अभावनेच जाणवतात तथापि, आपल्या मना-

तील आशयाच्या वेगळेपणाला साकार करणाऱ्या नव्या प्रतिमा मुक्त मनाने कवीने

'निखारा' मध्ये योजिलेल्या आहेत काही लक्षवेधी प्रतिमा अशा-

  'जेव्हा सूर्याला म्हातारपण येते' ( बाजार )

  'असाच त्याने गावात उजेड पेरला'(राणूमास्तर)

  'रात्रीच प्रेत दिवसाच्या खांद्यावर आहे' (नवीन सूर्य )

  'पिंपळाच्या पाना पानातून ठिबकलेला ध्वनी (अभिवादन)

  मुलाच्या नौकरीचा कॉल आला

  बांझोट्या फांदीला फूल यावं...... अन

 फांदीने आपल्याच अंगावर खेळणाऱ्या पानांना गोड रस द्यावा, तसा त्यांने

आपल्या पहिल्या पगाराचा शेवट केला' ( एका मुलाच्या बापाने) विना तेला

मिठाच्या भाजीची उकळी हसू लागली ( एका मूलाच्या बापाने ) या कविता मधील

शब्द कळाही अशीच काव्यानूभूतीशी जखडलेली आहे. युगंधर माझा, सोनबाटा,

आलेख           ६३