पान:आलेख.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





नऊं  विषयाची निवड आणि संशोधन पद्धती

 अभ्यासक जेव्हा संशोधनासाठी उत्सुक असतो तेव्हा त्याच्या समोर अभ्यास

विषयांचा तोटा नसतो. उलट आपल्या समोरच्या अनेक विषयांमधून कोणत्या

विषयाचे आव्हान स्वीकारावे असा यक्ष प्रश्न त्याच्या पुढे उभा राहतो. अशी

विषयांची उणीव अभ्यासकाला भासत नाही तेव्हा खऱ्या अर्थाने तो संशोधन करू

इच्छितो असे मानायला हरकत नाही. आपल्या समोर गर्दी करणाऱ्या विषयांपैकी

कोणते विषय वगळावे आणि कोणत्या विषयाचे कोणत्या मर्यादेपर्यंतचे संशोधन

करावे यासाठी मार्गदर्शकाची आवश्यकता भासते विद्यार्थ्यांची झेप, कुवत आणि

सामर्थ्य जोखून मार्गदर्शक त्याला योग्य दिशा दाखवितात.

 वाङ्मयाच्या अभ्यासकांनी जर वाङ्मयेतिहास सूक्ष्मपणे बारकाईने वाचले

तर अनेक विषय अलक्षित, अस्पर्शित राहिलेले दिसतील अनेक ठिकाणी नवे

संशोधन करण्यास वाव आहे हे लक्षात येईल. शिवाय आपल्या पूर्वीच्या संशोधक

अभ्यासकांनी जाणता. अजाणता काही सुचविलेले असते. या सगळ्या सूचना नोट,

पकडता आल्या तर संशोधकाची वाट मोकळी होते.

 मी जेव्हा माझ्या संशोधन विषयाचा विचार करीत होतो तेव्हा आपोआप व

आपल्या मनःपिंडानुसार विषय सुचले. महानुभाव वाड्मय, समर्थ संप्रदाय लोक

साहित्य, अनंत काणेकर इत्यादी. पण मनात अध्यापनाच्या निमित्ताने दुर्गाल

भागवतांचे 'व्यासपर्व' ठसले होते. महाभारतावर आधारित अर्वाचीन मराठी

ललित साहित्य अभ्यासावे असे वाटत होते. मराठी साहित्यिकही महाभारताकडे

आपले लक्ष वेधतात. त्यांचे महाभारताचे आकलन समर्थ व संपन्न आहे हे

जाणवले.

आलेख           ६५