पान:आलेख.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





 हे त्याला पुरतेपणी उमगले आहे. जीवनातील कटु अनुभवांचे विष पचवि

ल्याची ताकद या कवीच्या वृत्तीत आहे.

  'कळले मला या विषारी सापाचे बोलणे.

  तरीही अमृतकुंभ त्याच्या

  ओठास लावणे'

 'ऑपरेशन' 'सुर्य अस्ताला गेला म्हणजे' 'एका मुलाच्या बापाने' या काही

कवितांमधुन 'असेच भयंकर' मन विषण्ण करणारे अनुभव - चित्रण आढळते ते

निश्चितच हृदयस्पर्शी झाले आहे. आपल्या आयुष्याची झालेली आणि होणारी

हेळसांड भरून निघणारी नाही. हे जणू या कवीला कळून चुकले आहे. म्हणूनच

ते म्हणतात

  'सारे काही झाले खुंटीने अलगद

  मणी गिळले.

 ‘मित्रांनो ! असे असेच आयुष्य बरबाद होत चालले' म्हणूनच उध्वस्त

घराचे नकाशे कवीच्या हृदयावर कोरले जातांत आणि पाण्याच्याही थेंबाथेंबावर

आपले नांव गोंदले जाते.असे वाटते आपल्या या जंगणाच्या मोबदल्यात येथे

काही मागणे नाही. कोणाची मदतही अपेक्षिली नाही स्वतःच्याच भविष्याची लेणी

स्वतःच्याच हृदय–पटलावर कोरण्याची जिद्द येथे आहे. जगण्याचा मार्ग माहित

व्हावा म्हणून कवीला 'ब्रेनवाशिंग' होणे आवश्यक वाटते.

  काळोखात

  डोळे उघळे ठेवले म्हणजे

  काळोखाच्या डोळयाने

  पाहता येते (पू. ३३)

ही सवय स्वतःला लावली पाहिजे कारण -

  काळया माणसांच्या देशात

  वादळ होऊनच जगावे लागते (पु. ३४)

मात्र हे सारेज अगदी असहय आणि अती झाले की कबी दम भरती-

लक्षात आणून देतो की-

  'आमच्या कोठारात

  ढासून भरलाय फॉस्फरस'

 सनातनी जुलमांचे आणि अन्यायाचे परखड चित्रण या संग्रहातील 'तीन

चिंतनामध्ये यशस्वीपणे आकार झाले आहे' युगंधराच्या आदर्शाची ओढ ठेवून

त्याने दाखविलेल्या वाटेकडे डोळे लावून स्वतःला सावरण्याचा येथे प्रयत्न आहे

  'मातीतून केलें । कळस सोन्याचे


६२            आलेख