पान:आलेख.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




कमालीचा उद्वेग आहे. तरीही तो भडक आक्रोश आणि आनंदाला सामोरा जात

नाही. विद्रोहाचे पाणी पेटल्याची भाषा या कवितेत नाही. निखारामधून एक

सात्विक संताप व्यक्त होतो. कवीचा हा संयम त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मोठा

मनोवेधक धर्म या संग्रहातून आपल्याला प्रतीत होतो.

 नीलकांत चव्हाण यांच्या डोळया समोर निश्चितच दुःखाने भरलेल्या

टोपल्या डोक्यावर घेऊन हिंडणारी, काळवंडलेल्या चेहन्यांची माणसे आहेत. तेच

खरे त्यांचे भावविश्व आहे, दु.खाची प्रगाढ छायाच येथे प्रभावी आहे. पोटाला

चिमटा देऊन शिकविणाऱ्या राणू मास्तराचे थडगे पाहिले म्हणजे कवींच्या त्यांच्या

विषयीच्या साऱ्या स्मृती उचंबळून येतात.

 'साला राणूमास्तर' महाराच्या पोरीनाही शिकवतो ! असे म्हणून राणूमां-

स्तरांचा वर्ण व्देषातून खून होतो याचे वर्णन कवीने

 'आणि ती काळोखात गुदमरली रात्र न्हारी....शांत झाली'

असे केले आहे. याच्याही पुढे जाऊन कवी म्हणतो.

 ‘आता, त्याचे थडगे पाहिले. म्हणजे दिशा कोसळून पडतात.' (पृ. १२)

तरीही हा पोटाला चिमटा घेऊन बाराखडी शिकविणारा 'राणू मास्तर' कवीच्या

मनावर बिंबलेला आहेच. अजूनही त्यांच्या समोरून ते कोरले गेलेले चित्र नाहीसे

होत नाही.

 ज्ञान सागराच्या महाव्दारापाशी आपले भविष्य कोरीत उभे राहिलेल्या या

कवीला लोक विलक्षण आत्मविश्वासही आहे तो म्हणतो.

  'अरे, मी ही कधी काळी

  सूर्य हातावर खेळविला होता

  सारे जगच मी झुळविले होते

  माझ्या शब्द शस्त्रानी (पू. १७) '

 आपण स्टॅम्प मारलेल्या गल्ली सारख्या जन्माने ठरण्याचे दुःख उत्कट

बनते. हा आवेग 'माझ्या जगण्याने' या कवितेतून व्यक्त होतो.

  'आता पर्यंतच्या माझ्या जगण्याने मला काय दिले ?

  उष्ण अनुभव (पू. १८)

 असे असुनही निराश न होता एका 'नवीन सूर्याचा ध्यास धरुन हा कवी

नवी उमेद धरतो. पण ही उमेद दीर्घकाळ टिकत नाही.

  'मी ही मरणाला कवटाळीत आहे.

  फरफटत जंगलातून चाललो आहे' (पू. २०) मात्र

  'जरी समुद्रात बुडाला सूर्य डोळे बंद करून

  चालणार नाही'

आलेख           ६१