पान:आलेख.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

<




आठ काव्यात फुललेला ' निखारा'

  निखारा' हा श्री नीलकान्त चव्हाण यांच्या अवघ्या ३४ निवडक

कवितांचा काव्यसंग्रह आहे. त्यातही पुन्हा या सान्याच कविता कमालीच्या मित-

भाषी आणि आटोपशीर आहेत. त्यात अघळपघळवणा नाही तरी त्या पुष्कळ

पुष्कळ सुचवून जातात.

 प्रस्तुत कवीचा हा पहिलाच काव्यसंग्रह असूनही त्यात नवशिकेपणा,

नवखेपणा किंवा बुजरेपणा जाणवत नाही वरेच कवी अनेकदा आपल्या पहिल्या

संग्रहात चाचपडत असतात. निसटू पाहणारे क्षण आणि अनुभव पकडून ठेवण्याचा

प्रयत्न करतात.

 'निखारा' मधील कवितेत भावनेची तीव्रता आहे. पण त्यात पराकोटीचा

'उद्रेक' नाही आतल्या आत, खोलवर काहीतरी घुमसत आहे. साऱ्या मर्यादा

पाळून सौम्य स्वरूपातच ते येथे प्रकट होते. विद्रोहाचा किंवा ज्वालामुखीचा

सवंत स्फोट येथे नाही. भडक आक्रोश नाही. म्हणूनच नीलकान्त चव्हाणांच्या

कवितेविषयी कुतूहल वाटते. आणि वाचकाच्या मनात भुलावण निर्माण होते,

कवीने पाळलेला संयम 'निखारा ' या शीर्षकातूनही व्यक्त होतो,

 या काव्यसंग्रहातील 'बाजारराणूमास्तर डोळे फुटलेली संध्याकाळ'

'मला पाहिजे ' माझ्या जगण्याने, ' ‘आयुष्य.' 'युगंधर,' 'निखारा,' 'एका

मुलाच्या बापाने, 'सुर्य अस्ताला गेला म्हणजे, काळोख या कविता आपले

लक्ष विशेष वेधून घेतात. कारण या कवितांमधून कविने आपल्या जाणीवा आणि

अनुभव प्रांजळ मनाने व्यक्त केले आहेत. त्यात दलितांवर झालेल्या अन्यायाची

मनापासून चीड व्यक्त होते. कनी अंर्तगामी भरपूर धुमसतो. त्याला या गोष्टीबद्दल


६०       {gap}}  आलेख