पान:आलेख.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





पत अंजू झाली तरी पुरे !' अशी ही स्वाभाविक नित्याची तडजोड होते. या तड-

जोडीत कमालीचे कारुण्य आहे
.

 'अंजू' ! कथेत लेखकाच्या कल्पनेचे हे सारे खेळ आले आहेत. 'अंजू ला

कोण होणार ? विचारल्या नंतर ती मात्र मार्मिकच उत्तर देते. 'मी' मी होणार..!

ही स्वयंप्रवृत्ती अंजूनच आहे. गोसाव्याने खडीसाखरेचा म्हणून अंजू मातीच्या

चार खड्यांचा नैवेद्य दाखविते. भींत तिच्यासाठी सर्वस्वच असते. ती भिंतीतून तेल

काढते-भिंतीशी सजीवासारखे बोलते. भिंतीला ती 'मंजू' ही म्हणते. असे हे

अंजूचे विश्व आहे. लेखकाला तिच्या कल्पनाशक्तीचा उत्कट प्रत्यय येतो.

 'रात्र' घरात येईल म्हणून अंजू दार खिडक्या बंद करायला लावते. 'मग अंधार

माझ्या डोळ्यात शिरले ना ? अशा काव्यात्मक कल्पना तिच्या मनात घर करून

बसल्या आहेत. हीच अंजू स्वतःबद्दल तटस्थपणे व त्रयस्थपणे बोलू शकते. ती

स्वतःला कडेवर उचलून घेते. पासून तिची ही कमालीची कलात्मक अलिप्तता

आहे म्हणून कदाचित ती लेखिका होईल असे बापाला वाटले होते. दिव्याच्या उजे-

डात कॉटवरुन धावतांना ती स्वतःची सावली धरण्याचा प्रयत्न करते. हा छाया-

प्रकाशाचा खेळ कलावंताच्या जीवनातीलच लेखकाला वाटतो. लेखकाने स्वतःच्या

कल्पनेने तिच्या साध्या खेळण्यातून हे सारे अर्थ काढले आहेत. पण मग त्यांचे मन

चरचरते. अनुभवाची ( ह्या विचित्र ) दाहकता जाणवते व अंजूने कलावंत होण्या-

पेक्षा चार चौघांच्या सारख व्यवहाराच्या पातळीवरील जीवनच पत्करावं अस

वाटतं इतक्यात अंजू म्हातारी होऊन येते. मग लेखकाला प्रश्न पडतो 'या

दोन टोकांतली अंजू कोणती ?' 'अंजू मध्ये जाणवलेला कलावंत या पंडित शेट्ये

यांच्यातील आहे. स्वतंत्र जग निर्माण करून ते जिवंत करण्याची अंजूची ताकद

स्वतः लेखकातही जाणवते
.

आसमंत चित्रण अर्थपूर्ण -

 पंडित शेटे यांनी आपल्या कथांमधून चित्रित केलेली आसमंत, वातावरणाची

दृश्ये मोठी अर्थपूर्ण व विशेष लक्षणीय आहेत. बारकाव्यांसह तपशीलवार

चित्रणामुळे आसमंतातील वलय अर्थपूर्ण बनले. या अत्यंत वास्तव चित्रणातून

व्यक्ति आणि प्रसंग बोलके होतात. 'झिरमिर ' मधील न्यू पूना रेस्टारंटचे चित

लक्षवेधी आहे. ओरडणारा गेंगाण्या मारल्या 'तीन इसम तेरा आणे,दोन

इसम साडे दहा आणे'... अल्युमिनीयमच्या प्लेटस् मध्ये भडघांचे ढीग होते.'


आलेख           ५७