पान:आलेख.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





सरता काळ आणि बसता व्यापार ! सकाळपासून एखाद्या बाईमाणसासारखे तो

काम करी शिवाय व्यापारही सांभाळी. मानी सत्वस्थाचे हे असार व्रत स्वीकारलेले

भाऊ एकाच वेळी मृदु आणि कठोर स्वरूपाचे आहेत. 'आपल्या पोटाच्या गोळयाना

कधी मरे मरे तो मारतील आणि दुसऱ्याच क्षणी द्राक्षाचे धोसही भरवतील असे

हे भाऊ ! सदाचीच 'हुलकावणी' कथेच्या शेवटी देतात. 'भेट' कथेत सदैव कंप-

नीच्या कामात गुंतलेला उमाकान्त. त्याला भेटण्यासाठी मिरजेच्या स्टेशनवर

येणारी उर्मिला व बैबी संपूर्ण प्रवासात त्यांचे चित्र उमाकांतच्या डोळयासमोर

तरळतच राहते.

 पत्नीवर निरतीशय प्रेम करणारा तरुण उमाकांत पत्नीच्या प्रत्यक्ष भेटीत

जागच्या जागीच थिजतो एका विचित्र अशा दुराव्याच्या जाणीवेने तो व्याकुळ

होऊ लागतो. तुटकपणाच्या जाणिवेने !.
कथा लेखनात वेधकता

 एकुण पंडित शेटे यांच्या सर्वत कथांच्या आलेखनांत वेधकता आहे. व्यक्ती

अपूर्व वा अपरिचित आणि अनुभूती - अननुभूत अशी स्थिती त्यांच्या कथेत नसूनही

त्या वाचनीय होतात. अस्वस्थ, अनामिक ओढ असलेल्या या व्यक्तिरेखा आहेत.

या प्रत्येकाचे जीवन या ना त्या कारणाने होरपळलेले, खंती युक्त आहे. संवेदनशील

अशा या व्यक्तींच्या घडणीत पंडित शेटे यांच्या कलावंत मनातील 'स्वत्व' जागे

आहे, प्रभावी आहे. प्रत्येक कथेत आगळेपण आशयाच्या अभिव्यक्ती म्हणूनच

जाणवते. 'अंजु' हों या 'दुपार' मधील एक वैशिष्ठयपूर्ण कथा ! ती लक्षवेधी

आहे. 'अंजू' या २॥ वर्षे वयाच्या चिमुरड्या मुलीच्या चित्रणात हा

गढून गेला आहे. नाजुक कोमल भावनांचे अप्रतिम सौंदर्य पंडित शेटे यांना या

कथेत गवसल्या सारखे वाटते. 'अंजू' च्या स्वगतातून, उद्गारातून, नेणिवेतील अर्थ-

हीन वागण्यातून तिचे बाल सुलभ 'अंगणातील पोपटा' सारखे ( दिवाकर कृष्ण )

वेगळे जग साकार झाले आहे. 'अंजू' च्या या लटक्या, हळव्या, भाववेड्या, निर्लेप,

कोन्या, ताज्या जगात निवर मनाला मुळीच प्रवेश नाही. स्वच्छ काचेच्या भांडयात

चार्हि बाजूंची किरण शिरावेत तसं आजुबाजूचं जग या 'अंजु' च्या मनात झिर-

पत होते. लेखक अकारण तिच्या या जगाची मांडणी आणि नवी जुळणी करीत

बसतो.

 'अंजू' पुढे कोण होणार ? आईबाप नित्याचे मांडे रचीत जातात. आईला

'तिच्यात 'मॅथेमॅटिशियन' दिसतो तर बाबाला वाटते ती मोठी' 'लेखिका' होणार.

शेवटी 'माणसानं महत्त्वाकांक्षी असावे पण किमानपक्षी कॉलेजातील भाबशी इत-

५६             आलेख