पान:आलेख.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





 .... कांद्याच्या टचटचीत फोडी असलेली भजी आली की तिचा भपकारा येत

होता.... अशा या हॉटेलच्या मालकाचे चित्रही पाहण्याजोगे आहे.

 '.... त्याचे गाल आत चेपले होते व नाक बाहेर उमटून आलेले होते..

मोड हातात खुळखुळून हाताचे तळवे काळे पडले होते.' लेखकाचा अर्थपूर्ण वर्णने

आणि दृश्ये साकार करण्याकडे विशेष आहे. साधी'चमकी घातलेली म्हातारी'

म्हटले की सारे काही चमकून जाते. राजारामाची व्याकूळ मन:स्थिती आणि

त्याला कदाचित विसंवादी अशी झांजाच्या आवाजात दुमदुमणारी आरतीची लय

यांचे परस्पर प्रकाशी नाते जुळते. शाळा सुटते तेव्हा एखादीच्या जाळीच्या

पिशवीतून विणायच्या सुया बाहेर डोकावत होत्या' असे सूक्ष्म वर्णन'मैत्रिणी'

या कक्षेत येते.

स्वतःचेच अनुकरण

 लेखक कधी कधी स्वतःच्याच आवर्तात सापडतो. 'खळगा' 'विशाद' या

कथा यशस्वी म्हणता येत नाहीत. कारण लेखक स्वतःचेच अनुकरण करतांना

आढळतो एका कथे सारखी दुसरी कथा व्हायला लागते 'झिरमिर' मधील गंगाराम

आणि बाजार' मधील 'शरफुद्दीन' त्याचप्रमाणे 'गोळोण बाई' आणि 'जाधवबाई'

यांच्यात प्रकृती साम्य जाणवते. या कथात तोच तो पणा, पसरट शैली, विस्कळीत

अनुभव इ. गोष्टी जाणवतात. वर्णनाच्या हव्यासाने कथांची गली कुंठीत होतांना

दिसते. गंगाराम, वांमनची सायकल सगळी वाटेतील वर्णने केल्याशिवाय जणू पुढे

जाऊच शकत नाही.

कथाकारांचे प्रतिमा सामर्थ्य


 अप्रतिम प्रतिमांची पखरण त्यांच्या कथामधून झालेली दिसते 'दिगंबर' चे

गढूळ डोळे, मंतरलेला 'वामन' या एकाच शब्दाच्या प्रतिमा व्यक्ती मनःस्थिती

चित्रणास पुरेशा होतात, 'तरी पण 'सुटले ' या जाणिवेनं मन किंचित फुलारलं

शिळ्या भाजीवर पाणी मारल्यावर ती दिसते तसं' 1 ( मैत्रिणी) सोड्याच्या

फेसा सारखं उतू जाणार जीवन' (खळगा) 'चौकटीत चित्र असावं तशी एक

अँग्लो इंडीयन तरूणी दारात उभी होती, (खळगा)

कोवळ्या शेंगदाण्या सारखी गोरी पिट्ट । (मोकळा दिवस) अशा

बन्याच उल्लेखनीय अप्रतिम प्रतिमा आहेत.

५८           आलेख