पान:आलेख.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





 'चमकी घातलेली म्हातारी..... कानावर फुगे.... मुरडत नितंब डुच-

मळवीत गेलेली ती पोरगी रोपेजल्या सारखी ती दुसरी' नव्यानेच तो

हे सारखं जग अनुभवतो. निःसंकोच सरळ पण समतोल राखून सुसंयमाने लेखक

एका शृंगारिक अनुभवाला टिपतो. कोंबडीने दाणा टीपावा तितका अलगद ! विकृत

मनाचे अधिकृत चित्रण येथे घडते.
अनुभवाच्या विभिन्न पातळ्या

 या संग्रहातील 'दुपार,' आरती,' 'मैत्रीणी' या कथा विशेष लक्षणीय आहेत.

'मैत्रिणी' कथेत स्वतःची सत्य परिस्थिती दडवून ठेवून मोहक व स्वप्नाळू जगात

वावरणाऱ्या एका प्राथमिक शाळेतील शिक्षिकेचे जीवन रेखले आहे.

 म्युनिसिपालटीच्या शाळेतील. शक्यतो स्वत:ला टापटीपीन सजविणारी

रंगाने बेतास बात...अशी ही जाधवबाई ! इतरांनी हेवा करावा अशी तिची

पोझिशन. पण इंग्रजी शाळेतील रेवती गुप्ते येते आणि तिला एकदम 'डाऊन'

करते. जाधवबाई मानभावीपणे कुढते. मागे प्रचंड व्याप आणि एवढे लटांबर असू-

नही चक्क 'रेवती' ला जाधवबाई घुमवित राहते 'सासूबाईचा पंधरा तोळयाचा

छडा. दरमहा नवीन खरेदी..... नव्या कोटाचं कापडं....सगळा पगार बँकेत

जातो लॅम्ब्रेटा घेणार ? शेवटी मुख्याध्यापिकेकडून रेवतीला जाधवबाईची

करुणापूर्ण परिस्थिती कळते. असे हे जाधवबाईचे आगळे भावविश्व ! 'दुपार

कथेत नातूच्या लग्नानंतर आपले काय ? असा प्रश्न आक्काला पडतो. आक्काचा

कथेतील भावनिक ताण विलक्षण आहे. 'आरती' या कथेतील 'सुलु' चे दुःखही

असेच तीव्र आहे. आपली लहान मुलगी दिवंगत झाल्याने होरपून निघालेले दांपत्य

'सुलु' दुःख विसरतच नाही. प्रवास तीर्थयात्रा सगळेच जाचक होते.
मानवी मनाच्या शोधात रस.

 कै.पंडित शेटे यांना माणसाच्या मनात रस आहे. व्यक्ती व्यक्तींच्या अंत-

रीच्या व्यथा जीव ओतूनच ते साकार करतात. जीवनवादी नसून ते 'जीवनवेधी'

कथाकार असल्याचे जाणवते. गंभीरपणे ते या मानवी जीवनाकडे पाहतांना

आढळतात.

 'हुलकावणी' 'भेट,' 'मोकळा दिवस,' गोळे मास्तर,' 'बाजार' इ. कथा या

संदर्भात उल्लेखनीय आहेत. 'हुलकावणी' त एका वृद्ध पित्याचे जीवन आहे. मापल्या

लहान तीन मुलांचा प्रतिपाळ करण्याची जबाबदारी त्याचेवर असते. आयुष्याचा


आलेख           ५५