पान:आलेख.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



त्यांना मजा वाटते. 'अंजू' 'आरती, दुपार, झिरमिर,' 'मैत्रिणी,' इत्यादी कथांत

हे आढळते.

अनुभव विश्वाचा आवाका:

 कै. पंडित शेटे यांच्या अनुभव घनाला बराच मोठा आणि सखोल मावाका

असल्याचे आढळते. 'झिरमिर' कथेत एका संवेदनशील तरुणाचे भाव-जीवन ते

साकार करतात. 'वामन' हे त्याचे नांव ! समाजाला बुझणारा हा वामन आहे.

सामाजिक नितीमत्तेच्या बंधनात वामनच्या जीवनाचा एक भाग असून सतत विवे-

काचा पगडा त्याच्यावर आहे. तर दुसरीकडे चोरट्या शाकारलेल्या सुखावलेल्या

मनाची अनामिक ओढ त्याच्या मनाला सरळ मनाचा नुकताच कॉलेजातून बाहेर

पडलेला 'वामन' वाडीला राहिला. गांव ठीक पण इथे करमत नाही ही त्याची

सदाची तक्रार आहे. पण याला कमी नाही !' उजव्या नाकपुडीवर बोट मारून

म्हणणारा गावचा ट्रेडमार्क दिगंबर त्याला बाटलीत ऊतरवण्याचा प्रयत्न करतो.

दिगंबरचे तत्वज्ञान सरळ धोपट आहे. 'पण याला.' या वाक्यातील खोच त्याच्या

लक्षात येत नाही. जेव्हा लक्षात येते तेव्हा वामन म्हणतो. 'छे : छे! आहो भल-

तेच काय बोलता ?' पण कुठेतरी खोल त्याला सुखावल्या सारख झालं होत.

' असं म्हणायच असतं पण खरं कोणी कोस्ड नसतं' दिगंबरच्या या निर्लज्ज

'वाक्याने त्याचे डोके भणाणते. हळूहळू 'वामन' नकळत वेधला जातो. या त्याच्या

मनःस्थितीचं (state of mind) सूक्ष्म तरक भावांसह चित्र पंडित शेटे

रेखाटतात.


 दिगंबर सारखाच गंगाराम वार्डातील अनेकांचा हितचिंतक, मोहब्बती'

खातर फावल्या वेळात जबर हौसेने तो हा उद्योग करी. 'गंगाराम' ! असल्या हल-

कट गोष्टी माझ्यापाशी काढत जाऊ नको.' असे म्हणणारा 'वामन' पुन्हा तो भेट-

ल्यावर 'खरं म्हणजे या फालतू माणसाला सोडून पुढं जायला हवं पण पाय मात्र

ज़मिनीला खिळले होते.' 'वामनची ही घुटमळती चाल गंगारामनं हेरली होती.

गंगाराम बोलण्यात आणि वागण्यात सच्चा होता. भूक लागली की जे वाव' इतके

सरळ त्याचे गणित होते तशी काही मिष्टेक झाली तर या गंगारामला चौकात

जोड्यानं मारा' इथवर त्याची तयारी. वामन मंतरला.

 एकदाच पुन्हा कोण जातय या वाटेला' असे त्याने ठरविले. गंगाराम दर्दी.

त्याला या मधाच्या बोटांची चटक ठाकक होती. वाघाला रक्ताची असते तशीच!

एकाकडे गंगारामची किळस वामनला वाटे पण गुढ आकर्षणाने तो मनाने काठो-

काठ फेसाळला होता. मग या चित्रणातील झिरमिरित मुलायम पडदा टर्कन

फाडला जातो.


५४            आलेख