पान:आलेख.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे







सात   पंडित शेटे यांचे लेखन कथा




कथा विश्वासातील प्रयोग शीलता.


 साहित्याच्या क्षेत्रात नेहमीच प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार आणि

कुवतीनुसार प्रयोग करीत असतो. त्याचा लाभही कथाक्षेत्रात विशेष चैतन्य निर्माण

होण्यात आला आहे. पूर्वीच्या विविध प्रयोगांनी मराठी कथेला आजची नवी

प्रयोगावस्था प्राप्त करून दिली आहे. कै. पंडित शेटे या कथाकाराने एका नव्या

उमेदीने, नव्या जाणीवांसह सर्व सामर्थ्यपणाला लावून कथाक्षेत्रांत पदार्पण कर

ण्याचा प्रयत्न केला आहे.

'दुपार' एकुलता एक कथासंग्रह.


 'दुषार' हा के. पंडित शेटे यांचा एकुलता एक कथासंग्रह. ऐन उमेदीने लेख-

नाला प्रारंभ केला अन् अकाली काळाची झडप आमच्यातून ह्या नवोदित कथा-

काराला घेऊन गेली. यावेळी 'विधि: बलवत्तर:' हे म्हणायची पाळी येते नाही तर

भरल्या तीटावरून माणसं उठलीच नसती.

 कै. पंडित शेटे यांच्या कथात व्यक्ती अधिक स्पष्ट रूपात व्यक्त होताना

दिसतात. त्यांच्या कथा व्यक्तीनी घडविल्या म्हणून त्या व्यक्तिप्रधान असतात.

स्वभाव लेखनात आणि सूक्ष्म व्यक्तीत्वांच्या आकलन, अवलोकनात त्यांना विशेष

रस आहे. त्यातून त्यांची कथा फुलते. 'झिरमिर' मधोल' गंगाराम,' 'वामन',

'दुपार' 'मैत्रिणी,' 'तील आक्का' जाधवबाई' या व्यक्तीचे भावविश्व रंगविण्यात

आलेख           ५३