पान:आलेख.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





  कौतुक -भरल्या पायांनी प्रदक्षिणा घालील,

  निदान तिन्ही सांजेला पणती लावून जाईल...'

 त्याची समजूत घालतांना आभाळही हरले आहे. व्कचित यमकांचा आग्रह

दिसतो. बाहुली या कवितेतील बाहुल्यांची नावे पहा - ठकी, कंकी, पिंपी, चंपी,

सोनी इत्यादि. आशय दृष्ट्या उत्तम प्रतिभात्मक कविता गहन अर्थाने भरलेली

आहे. पण हा यमक अट्टाहास इथे जाणवतो. क्वचित आशय कल्पनांची संदिग्धताही

जाणवते. उदा. 'डोंगराच्या पायथ्याशी रेघ धुराची वोळेना' 'एक संपलेली सोबत'

(पृ. ९०) 'एका क्षणात' (पृ. ३८) या कवितांचाही या संदर्भात उल्लेख करता

येईल. तथापि रसिक मनाला गुंगवत ठेवणारी नुसती नव्हे तर तरल भावविश्वकडे

नेणारीच त्यांच्या कवितेची भाषा आहे. 'बाहुल्या'तील कवितांचे सामर्थ्य आशयाला

साकार करणाऱ्या यशस्वी समर्थ भाषाशैलीमध्ये, याची जाणीव झाल्याशिवाय

रहात नाही.

           x x x















५२           आलेख