पान:आलेख.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





सावलीची दगडी पायरीशी झालेली बातचीत मोठी कल्पक, भावकोवळी आणि

सूचक आहे.

  'मीच जाणले गुप्रित जधी ती

  बघत राहिली हिरवी कैरी'

 'बाहुल्या'त अशा कितीतरी मनोरम कल्पना सर्वत्र विखलेल्या आहेत.त्या

मोठ्या हृद्य आहेत. सारवलेली धरणी शेणाच्या रंगाने हिरवी दिसते पण कव-

यित्रि ते पाहून म्हणते. 'ऐकून झाली हिरवी मखमल' नवजाताच्या आगतस्वागता-

साठी आतुरलली सृष्टी मोठी अप्रतिम वर्णिली आहे. आभाळ मावणाऱ्या आणि

पौर्णिमेचा मेळ असलेल्या डोळांना दृष्ट लागते. चंद्रसूर्य तोलणारी पापणी भास-

वून जाते याचे सुंदर वर्णन 'दृष्ट (पृ. ४४) या कवितेत येते.

  'बाळ उतरे अंगणी

   भान कशाचे ना त्याला

  उंचावून दोन्ही मुठी

   कण्या शिपतो चिऊला.'

 चिमुकल्या बाळाचे मोठे सजीव चित्र रेखाटण्यातून संतांचे सामर्थ्य 'बाळ

उत्तरे अंगणी' या कवितेतून प्रत्ययाला येते.

 सुंदर कल्पनांची पखरण बाहुल्यातूनही सर्वत्र आढळते.'निळ्या पिसांची

रास' ही दुरून दिसणाऱ्या डोंगरांना पाहून केलेली कल्पना किंवा 'मोरमन' या

शब्दांतून सूचित केलेले मनाचे वर्तन मोठे सूचक आहे. लक्षणीय आहे. तसेच 'सरा-

वलेली हिरवी जमीन' 'तुळशी वृंदावन' 'गंधाली' 'बाहुल्या' 'आकाश' 'मनमोर

नाचणे' इत्यादि प्रतिमा मोठ्या बोलक्या आहेत. कल्पनांप्रमाणेच भावानुकूल सुंदर

शब्दांची पखरणही सर्वत्र दिसून येते. हे इंदिरा संत यांच्या कवितेचे खास वैशि-

ष्ट्यच आहे. आशय आणि मन त्यांच्या जुळणी मुळेच भावानुभवाची सहजसुलभ

उत्कट अभिव्यक्ती लेखिकेला करता आली आहे. उदा. 'औक्षण' (पृ. २०) हतबल,

पराधीन स्थितीचे चित्रण यथार्थ शब्दात कवयित्रीने वर्णन केले आहे.

  'नाही मुठीमध्ये द्रव्य

  नाही शिरेमध्ये रक्त

  काय करावे कळेना कष्टाचे सामर्थ्य

 किंवा तुळशीवृंदावन (पृ. १०) या कवितेत तुळशीवृंदावन प्रतिक (sym-

bol) बनले आहे. या प्रतिकातून सूचित केलेल्या अर्थाचा वेध घेण्यासाठी आलेली

भाषा लक्षात घेण्याजोगी आहे,

  'धनीण येईल, हळदकुंकू वाहील,

  चांदीच्या झारीने पाणी शिंपील, आलेख          ५१