पान:आलेख.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





  'घटप्रभेच्या झुलत्या पुलावर मधेच पाण्याच्या

  भन्नाट प्रवाहा बरोबर डोळे घालवणारे

  ते भेदरलेले मूल...'

 'त्यांचा संसार' या कवितेत उंदरांच्या धामधूमीचे मोठे वास्तव दर्शन घडवि-

लेले आहे. 'पेपर' या कवितेतही असे वर्णन पहावयाला मिळते.

  "पहाटेचा पहिला श्वास

  कागदाच्या खरपूस वासाचा, ताज्या छपाईच्या शाईचा

  मथळ्यातून, मजकूरांतून पुन्हा आकार घेते

  एक घडून गेलेले विश्व."

 'तुझी इवली पाउले' (पृ. ३०), चिमुकली पाहुणी (पृ. ३४), सोन्याची

कोयरी (पू. ५०), बाळ उतरे अंगणी (पू. ५६), उभा बाळ दारापाशी (पु. ९४)

इ. कवितांमधून निरागस भावसौंदर्य, बालविश्वात रमलेल्या घराचे वर्णन साकार

झाले आहे. स्त्री-गीत आणि ओवी अभंग छंदाची आठवण शैलीच्या संदर्भात या

कविता वाचीत असताना होते. 'तुझी इवली पाउले' या कवितेत किती हुबेहुब

वर्णने आले आहे.

  'मान करून बाकडी

  किती विचारशी प्रश्न

  आणि उत्तराच्यासाठी

  किंती राहसी हटून !'

 स्वभावोक्ती अलंकाराचे हे उदाहरण म्हणावे लागेल. भावनेची प्रभावी व

उत्कट अभिव्यक्ती 'चिमुकली पाहुणी' या कवितेत व्यक्त झालेली आहे.

  चिमुकल्या पाहणीचे घरी आज आगमन

  वास्तबक आणि मीच निरांजन, (पुं. ३४)

 बाहुल्यातील कवितेची भाषा ही प्रतिमांची भाषा आहे. 'खांद्यावरती तान्हे

मूल, पुढे मागे आणखी आहे इथे सूचकता व्यक्त झाली आहे. तर 'ब्रह्मांडाचा

पासंगही पुरणार नाही इतका जड़ तो दिवस झाला.' इथे परिणाम घडविणारी

प्रतिमा आली आहे. 'कुटुंबातील नीटस पोरीचे आरंभीचे उमेदीचे स्वप्नील भाव-

विश्व आणि नंतर जीवनातील कठोर वास्तव उलगडल्यावर तिच्यात आलेल्या बन

चुकेपणाचे अप्रतिम यथार्थं भाषेत रेखाटलेले शब्दचित मुळांतून पहाण्याजोगेच

आहे. 'अजाणाहून अजाण हे मन' (१. ३०) शब्दांकित करणे कठीण असूनही

शब्दांकित केले आहे. वस्तुत: 'गहन गूढ़तर पदावली ही' प्रत्ययाला येते. 'चिमुकल्या

पाहुणीचे स्वागत करताना सगळी ओढ शब्दात मोठ्या यशस्वीपणे कवयित्रीला

आणता वालेली आहे. 'दारापुढच्या आंब्याखालुन (१. ३६) येणाऱ्या शीतल

५०          आलेख