पान:आलेख.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




आविष्कार आहे हे हि इथे जाणवल्या शिवाय रहात नाही. सर्व सामर्थ्यानिशी

हीच अनुभूती त्यांच्या कवितेतून जिवंत होते. चैतन्य पूर्ण स्वरूपात साकार होते.

 कवी अनिलांच्या (आ. रा. देशपांडे) कवितेशी त्यांची तुलना आकलनाला

अधिक मदत करू शकते असे वाटल्यावरून केली आहे. अंतर्मुख होऊन सूक्ष्म-लय-

बद्ध चितनशील नाजुक भावभावनांचा प्रणय कवितेतील आविष्कार हाच खऱ्या

अर्थाने अनिलांचा पिंड आहे, धर्म आहे असे म्हणता येईल. ज्यावेळी ते समाजचिंतन

प्रक्षोभ, मानवतावादी विचार व्यक्त करु पहातात त्यावेळी अनुभव प्रामाणिक तळ-

मळीने व्यक्त करीत कसले तरी ते त्यांचा प्रेमानुभव व्यक्त होताना जेवढे काव्यात्म

बनतात त्या पातळीवर जातांना दिसत नाही. इंदिरा संतांच्याही पतीवरील अनन्य

निष्ठा व्यक्त करणान्या कवितांखेरीज फार थोड्याच कविता भावोत्कट बनून

काव्यात्म पातळीवर जाताना दिसतील', अंतर्मुख वृत्तीतून साकार झालेल्या दिस.

तील. पण अन्य आशयाला जिवंत करु पाहणाऱ्या कविता काहीशा बहिर्मुख वृत्ती-

तून प्रकट चिंतनातून अवतरलेल्याच दिसतील या. संदर्भात बाहुल्यातील स्त्री-

जीवन चित्रित करणा-या कवितांचा उल्लेख करता येईल. या कविता वाचनीय

असल्या तरी फार मोठा भावगर्भ वा सखोल चिंतनातून संवेदना बनून व्यक्त

झालेल्या आहेत असे म्हणता येणार नाही.

 याचे महत्त्वाचे कारण कविचे मन त्या आशयाला दिले गेले तरच ते बीज

रुजते, अन्यथा त्याचा उत्कट अविष्कार असंभवनीय होतो. आशय हृदय बनले

पाहिजे तर ती कविता कविता होते. कवीच्या व्यक्तिमत्त्वानुसार काही अनुभव

काव्यात्म पातळीवर जाऊच शकत नाहीत, अशा अनुभवांना त्या कवी मनात तेवढे

स्थान असत नाही. म्हणून त्यांची अभिव्यक्तीही समर्थ बनत नाही. बाहुल्यातील

काही कवितांच्या बाबतीत हे प्रत्ययाला येते. कदाचित इंदिरा संतांनाही याची

जाणीव झाली असावी येते आभाळ भरून' या कवितेत त्या म्हणतात-निसर्गातील

ही दौलत-भरून आलेले आभाळ, पानात नाचणारा वारा, निळया पिसांच्या राशी-

सारखे दूरचे डोंगर हे सारे पाहून-

   पाहून हे सारे नाचणारे

    आज कुठे मोरमन

   पाहून हे जावे भाव

    असे कुठे ते उन्मन

 एवढे निश्चित जाणवते की, 'बाहुल्या'त इंदिरा संतांनी आपल्या अनुभवाच्या

कक्षा अधिक व्यापक बनविलेल्या आहेत. संपूर्ण तन्मयता या रुंदावलेल्या कक्षांशी

साधत नसली तरी विविध भाव भावना या कविता व्यक्त करताना दिसतात.

आलेख           ४७