पान:आलेख.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




प्रणयाची निसर्गाची चित्रे रेखाटताना बाहुल्यातहो अंतर्मुख होऊन आशायाशी

एकतानता साधली जाते.

 'ती ही वास्तू' (पृ. ८) या कवितेत वस्तुतील हृद्य आठवणी येतात. १९४७

च्या वणव्यातील आहुती ही वास्तू झालेली आहे. स्वयंपाक घर, देवघर, माजघर

यातील या आठवांनी स्मृतींनी त्यांचे मन उचंबळून येते. या वास्तूचे झालेले भया-

नक हाल 'याची देही याची डोळा' पहाण्याचे नशिबी येते त्याचा अभद्र बंद

दरवाजा पाहून मात्र त्यांचे भाव अभावरूप होतात. इथे घराबद्दलचे प्रेम व्यक्त

झाले आहे. बालांच्या लहानग्यांच्या भावविश्चाचे मोठे सूक्ष्म निरीक्षण त्या कर-

तात. भातुकली, उभा काळ दारापाशी या बालविश्वांत रंगून लिहिलेल्या कविता

या संदर्भात उल्लेखिता येतील.

 एक वेगळी कविता म्हणून, कैलास लेणे' (पृ. ५३ ) कवितेचा उल्लेख

करता येईल. श्रेष्ठ कलेची कदर या कलावंत मनाला आहे. कैलास लेणे पाहतांना

सारा अहंकार बाजूला ठेवावा. 'ठेव उतरुनी असला शेंदूर आल्यावरचा'. आरंभी

रंगीत चष्मा, ट्रान्झिस्टर, पादत्राणे, थर्मास त्या बाजूला ठेवायला सांगतात. पण

शेवटी

  पुरे न झुके, ठेव उतरूनी तुझिया मधले

  तुझे तुझें पण.

 इथे मी मी म्हणणाऱ्या कलावंत, चित्रकार, अभ्यासू, रसिक, कवी, समीक्षक

सान्यांनाच भव्य कला कृती पुढे नंत मस्तक होण्याचा आदेश दिला आहे. होऊन

जा तू मुदुल नम्रशी धूलिकणासम' कारण कैलासाचे अप्रतिम लेणे पाहून नजरेची

छन्नी होते. 'प्राणसईला अगत्याने मोठ्या जिव्हाळयाने एका कवितेत त्या बोलाव-

तात. आतुर हळूवार भाव या कवितेत व्यक्त झाला आहे. त्यांचा संसार ( पृ.६५)

मध्ये उंदराच्या त्रासाने रात्री होणाऱ्या पडझडीचे वर्णन केलेले आहे. 'आक्रोश'

(पृ.६७) 'पेपर' (पृ. ७५) 'ही जमीन' (पृ. ८१) 'शी बाई' पाऊस पाऊस'

(पृ. ८७) या त्यांच्या वेगळ्या आशयाला प्रकट करणा-या कविता. 'बाहुल्या' तील

या कविता म्हणजे स्वप्नांचा पिसारा फुलवून नाचलेला हां मनमोर ! स्वप्नांतलेच

समाधान व्यक्त करणारा आहे.


चार

 इंदिरा संतांच्या कवितेची भाषा अनुभव समर्थपणे चित्रित करणारी आहे

. अत्यंत कोवळे, नाजुक भाव त्या मोठचा तरलतेने आपल्या कवितातून व्यक्त कर-
४८          आलेख